महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Chandrashekhar Bawankule: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम महसूल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Chandrashekhar Bawankule

 

दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून घेणार आढावा बैठक

हिंगोली (Chandrashekhar Bawankule) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम महसूल मंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.

प्राप्त कार्यक्रमानुसार, सोमवारी सकाळी ९ वाजता हिंगोली येथे दुष्काळग्रस्त भागाचा पीक पाहणी दौरा करून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातच दुष्काळजन्य परिस्थितीची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये जाहीर झालेल्या दुष्काळी परिस्थिती, करण्यात आलेल्या पंचनाम्यांचा आढावा आणि शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा होणार आहे. दुपारी १२ वाजता ते मोटारीने हिंगोली येथून नांदेडकडे रवाना होणार आहेत. एकीकडे दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे मध्यंतरी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी नुकसानग्रस्त भागातील शेती पिकाची पाहणी केली. यासोबतच आमदार रोहित पवार तसेच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील वसमत तालुक्यातील माळवटा भागात नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी केली. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता हिंगोली जिल्ह्यात सोमवारी येणार आहेत.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा काँग्रेसने अडविला

महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा काँग्रेसने अडविला

Chandrashekhar Bawankule: जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला असला तरी शेतकर्‍यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तातडीने मदत करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर काँग्रेस पदाधिकारी

Sep 28, 2026