नळदुर्ग किल्ला महिला आत्महत्या

नळदुर्ग किल्ल्यातील बुरुजावरून तीन मुलांसह उडी घेत महिलेची आत्महत्या!

Naldurg Fort Woman Suicide: नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील उपळी बुरुजावरून गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेने आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याची दुर्दैवी

नळदुर्ग किल्ल्यातील बुरुजावरून तीन मुलांसह उडी घेत महिलेची आत्महत्या!

Naldurg Fort Woman Suicide

दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

उमरगा (Naldurg Fort Woman Suicide) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील उपळी बुरुजावरून गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेने आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. या (Naldurg Fort Woman Suicide) घटनेत महिलेचा आणि तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. अश्विनी मोहिते (रा. व्हंताळ, ता. उमरगा; सासर अंबुलगा, ता. निलंगा) असे या महिलेचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. अश्विनी मोहिते या शालेय जीवनापासूनच कुस्ती स्पर्धांमध्ये अव्वल ठरणाऱ्या खेळाडू म्हणून परिचित होत्या.

प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी आपल्या एका मुलाला प्रथम बुरुजावरून खाली ढकलले आणि त्यानंतर स्वतः उडी घेतली. त्यांच्यासोबत दोन मुलींनीही उडी घेतली. या (Naldurg Fort Woman Suicide) घटनेत महिलेचा आणि मुलाचा मृत्यू झाला, तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी मुलींना तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे व्हंताळ आणि अंबुलगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, नळदुर्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

एकाच चित्तेवर तिघां माय-लेकरांवर अंत्यसंस्कार

एकाच चित्तेवर तिघां माय-लेकरांवर अंत्यसंस्कार

Naldurg Fort Woman Suicide: नळदुर्ग येथील किल्ल्यातील बुरुजावरून उडी घेऊन आपल्या तीन लेकरांसह आत्महत्या केलेल्या मातेचे दोन लेकरांसह एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात येऊन..

Sep 06, 2026
धाराशिव प्रकरणात नवा खुलासा; तीन मुलांसह अश्विनी पौळ यांची उडी;  मुलांसह किल्ल्यावर जाण्यापूर्वी केला होता केक कट

धाराशिव प्रकरणात नवा खुलासा; तीन मुलांसह अश्विनी पौळ यांची उडी; मुलांसह किल्ल्यावर जाण्यापूर्वी केला होता केक कट

नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरुजावरून राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.

Sep 04, 2026
धाराशिवमध्ये धक्कादायक घटना; तीन मुलांसह महिलेने नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतली, दोघांचा मृत्यू

धाराशिवमध्ये धक्कादायक घटना; तीन मुलांसह महिलेने नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतली, दोघांचा मृत्यू

​​​​​​​धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Sep 03, 2026
कन्हान नदीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले; २४ तासांत आरोपी जेरबंद

कन्हान नदीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले; २४ तासांत आरोपी जेरबंद

Kanhan River Death Case: सत्रापुर जवळील कन्हान नदीवरील जुन्या पुलावरून पडुन अश्विनी ऊर्फ रश्मी ऊर्फ आशी डे वय २९ वर्ष, रा. खामला, नागपुर हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे गूढ कन्हान पोलिस..

Aug 04, 2026
फ्लॅटसाठी ३ लाख, कारसाठी २ लाख; पैशांच्या मागण्यांनी घेतला विवाहितेचा बळी? पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा

फ्लॅटसाठी ३ लाख, कारसाठी २ लाख; पैशांच्या मागण्यांनी घेतला विवाहितेचा बळी? पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा

चंदननगर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Jun 04, 2026