मारुती कदम
उमरगा (Naldurg Fort Woman Suicide:) : नळदुर्ग येथील किल्ल्यातील बुरुजावरून उडी घेऊन आपल्या तीन लेकरांसह आत्महत्या केलेल्या मातेचे दोन लेकरांसह एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात येऊन तिघा मायलेकरांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
ही सुद्धा बघा: नळदुर्ग किल्ल्यातील बुरुजावरून तीन मुलांसह उडी घेत महिलेची आत्महत्या!
उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथील माहेर असलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्वीनी मोहिते- पौळ वय ३० यांनी गुरुवारी नळदुर्ग येथील ७० फुट उंच असलेल्या उपळी बुरूजावरून आपल्या तीन लेकरांना खाली ढकलून आत्महत्या केली. यावेळी अश्विनी पौळ व अंजिक्य पौळ वय साडेपाच वर्षे या (Naldurg Fort Woman Suicide) लेकरांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन जुळ्या मुली क्रांती पौळ व वीरा पौळ वय वर्षे अडीच यांच्यावर धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान मुलगी क्रांती पौळ हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी मयत अश्विनी , अंतिक्य व क्रांती या तिघा मायलेकरांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेह व्हंताळ गावांत येताच संपूर्ण ग्रामस्थांनी हंबरडा फोडला. संपूर्ण गाव सुन्न झाले होते. घटना कळाल्यापासून व्हंताळ ग्रामस्थांनी आपल्या चुली बंद ठेवल्या होत्या.
अश्विनी मोहिते - पौळ यांना बालपणापासूनच कुस्तीची आवड होती. त्यांना पाच सुवर्ण सहा रौप्य पदके प्राप्त झाली होती. निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील पैलवान मनोहर पौळ यांच्या सोबत सन २०१९ - २० या साली त्यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस त्या सासरी राहिल्या. पती मनोहर पौळ हे पुणे येथे रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहेत. अश्विनी यांना राष्ट्रीय कुस्ती खेळाडूच्या कोट्यातून मुंबई मेट्रोमध्ये नोकरी मिळाली होती. (Naldurg Fort Woman Suicide) आपली पत्नी अश्विनी हिने नोकरी करू नये, असे पती मनोहर यांना नेहमी वाटत असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे व्हायची. पती पत्नी मध्ये होणाऱ्या सततच्या भांडणाला वैतागून अश्विनी यांनी अखेर आपली नोकरी सोडून दिली. गेल्या तीन महिन्यांपासून मयत अश्विनी या व्हंताळ आपल्या माहेरी वास्तव्यास होत्या. मयत अश्विनीचे वडिल तानाजी मोहिते हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी तानाजी मोहिते हे प्रशिक्षणाकरिता लोहारा येथे गेले होते. पतीपत्नी मध्ये नेहमी मतभेद होत असल्याने अश्विनी यांनी काढलेल्या विमा पॉलीसांचे वारस म्हणून आपल्या वडिलांचे नांव नोंद केले आहे.
अल्पशा पती-पत्नीच्या संसाराला अखेर दृष्ट लागली. गुरुवार दि.३ सप्टेंबर रोजी आपल्या तीनही लेकरांसोबत किल्ल्याच्या पायथ्याशी केक कापून वाढदिवस साजरा केला. नेमका कोणाचा वाढदिवस साजरा केला, हे अद्याप समजले नाही. दरम्यान या (Naldurg Fort Woman Suicide) प्रकरणी अश्विनीचे वडील तानाजी मोहिते यांनी नवरा, सासू व अन्य नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिल्यावरून नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अश्विनीचा पती मनोहर पौळ (३२) सासरा अंकुश पंढरीनाथ पौळ (६५) सासू कालींदा अंकुश पौळ (५५) सासऱ्याची बहिण विमलबाई (सर्व रहाणार अंबुलगा ता. निलंगा जि.लातूर) यांना नळदुर्ग पोलिसांनी पुढील तपासाकरिता ताब्यात घेतले आहे. पोनि. रविंद्र गायकवाड पुढील तपास करित आहेत. दरम्यान या घटने मुळे व्हंताळ गावांसह सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकाच चित्तेवर माते सह दोन जिवापाड जपलेल्या लेकरांना अखेरचा निरोप देतांना उपस्थितांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.