Naldurg Fort Incident

धाराशिवमध्ये धक्कादायक घटना; तीन मुलांसह महिलेने नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतली, दोघांचा मृत्यू

​​​​​​​धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

धाराशिवमध्ये धक्कादायक घटना; तीन मुलांसह महिलेने नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतली, दोघांचा मृत्यू

Naldurg Fort Incident

आई आणि मुलाचा जागीच मृत्यू; दोन मुली गंभीर जखमी, घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका महिलेने आपल्या तीन मुलांसह किल्ल्यावरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महिला आणि तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी मुलींना उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला उमरगा तालुक्यातील वंताळा गावची रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन मुली आणि एका मुलासह ती नळदुर्ग किल्ल्यावर आली होती. त्यानंतर तिने मुलांसह किल्ल्यावरून उडी घेतली. या दुर्घटनेत महिला आणि तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत महिला आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. जखमी मुलींना पुढील उपचारासाठी धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

महिलेने एवढे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचा तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असून त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026