मोहसीन खान

मोहसीन खान यांना सलीमभाई मिर्झा समाज रत्न पुरस्कार

Mohsin Khan: लातूर येथील सामाजिक क्षेत्रात काम करणारे मोहसीन खान (Mohsin Khan) यांना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे स्वर्गीय सलीम भाई मिर्झा यांच्या नावाने समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला...

मोहसीन खान यांना सलीमभाई मिर्झा समाज रत्न पुरस्कार

Mohsin Khan

लातूर (Mohsin Khan) : लातूर येथील सामाजिक क्षेत्रात काम करणारे मोहसीन खान (Mohsin Khan) यांना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे स्वर्गीय सलीम भाई मिर्झा यांच्या नावाने समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कळंब येथे ईद-ए-मिलादुन्नबी आणि ज्ञानप्रकाश रौप्य महोत्सवानिमित्त 'मोहम्मद पैगंबरांच्या विचारांची आजच्या काळात गरज', 'शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज' 'शैक्षणिक समन्वय आणि सर्वधर्म समभाव' आदी विषयावर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. यावेळी सामाजिक कार्याबद्दल लातूरचे सामाजिक कार्यकर्ते  मोहसीन खान (Mohsin Khan) यांना हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशोक मोहेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप पाटील, अजितदादा पिंगळे राजेंद्र आबा मुंडे, मुख्तार मिर्झा होते तर प्रमुख वक्ता म्हणून अविनाश भारती हे उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी 'आगाज ' फाऊंडेशन अध्यक्ष अकिब नय्युम पटेल, उपाध्यक्ष कार्तिक इंगळे, सचिव मुस्तान मुक्तार मिर्झा, यांच्यासह इमरान जफरखान पठाण- सहसचिव, अक्षय सिद्धार्थ गायकवाड- कोषाध्यक्ष, शफिक महमूद शेख- कार्याध्यक्ष, ज्ञानेश्वर नरटे-खजिनदार, खादिम सय्यद- प्रसिद्धी प्रमुख, एडवोकेट विश्वजीत दुगाने व अमर पायाळ, रामेश्वर दारशेवाड, यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुस्तान मिर्झा यांनी केले तर आभार अकीब पटेल यांनी मानले.

प्रबोधन कार्याबद्दल सन्मान...
महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिव, शाहू, फुले, टिपू यांच्या विचारांनी समाजात प्रबोधन करणे, पीडित शोषित गरजवंत विद्यार्थ्यांसाठी काम, रक्तदानाची चळवळ उभी करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कणखरपणे उभे राहणे आदी  उपक्रम मोहसीन खान यांनी लातूर व संपूर्ण राज्यभर राबविले. याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026