महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, रिक्त पदे त्वरित भरा; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Maharashtra Competitive Exam: राज्यातील सरळ सेवा भरती प्रक्रिया वारंवार होणारा विलंब, पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे आणि गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान

स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, रिक्त पदे त्वरित भरा; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Maharashtra Competitive Exam

हिंगोली (Maharashtra Competitive Exam) : राज्यातील सरळ सेवा भरती प्रक्रिया वारंवार होणारा विलंब, पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे आणि गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा समन्वयक पदवीधर मतदार संघाच्या वतीने आज हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मराठवाडा समन्वयक पदवीधर मतदार संघाचे समन्वयक दिलीप हरिभाऊ घुगे यांच्या नेतृत्वाखाली भूषण पाईकराव, बंडू नरडवे, गजानन शिंदे आणि संदीप भुक्तर यांनी हे निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्यातील विविध (Maharashtra Competitive Exam) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने यावर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. सरळ सेवा भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्यावी. तंत्रज्ञानातील बिघाड आणि गैरप्रकार टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता परीक्षा घ्याव्यात.

त्याचबरोबर शासनमान्य विविध विभागांतील सर्व रिक्त पदांची जाहिरात काढून ती तात्काळ भरावीत अशी मागणीही करण्यात आली. (Maharashtra Competitive Exam) लघुलेखक पदांसाठी शासकीय विभागांतील रिक्त पदे भरून नियमित भरती प्रक्रिया राबवावी. TET परीक्षा देखील OMR आधारित ऑफलाइन पद्धतीने घ्यावी जेणेकरून तांत्रिक अडचणी आणि गैरप्रकार टाळता येतील.

पोलीस भरती 2024 साठी वयोमर्यादेत सूट देण्यात यावी आणि भरतीची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी अशी विनंती करण्यात आली. पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत. (Maharashtra Competitive Exam) स्पर्धा परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करावे जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळेल. NEET सह इतर सर्व भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ही (Maharashtra Competitive Exam) निवेदन महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. त्यामुळे शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा आणि हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

MPSC विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; कर्ज, दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचा पोलिसांकडून तपास

MPSC विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; कर्ज, दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचा पोलिसांकडून तपास

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर अडीच लाखांचे कर्ज होते. दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचाही संदर्भ समोर आला आहे.

Sep 09, 2026
पेपर लीक रोखण्यासाठी परीक्षा व्यवस्था बदलण्याची तयारी

पेपर लीक रोखण्यासाठी परीक्षा व्यवस्था बदलण्याची तयारी

Paper Leaks Task Force: केंद्र सरकारच्या 6 सदस्यीय उच्चाधिकार टास्क फोर्सने सार्वजनिक परीक्षांमध्ये व्यापक सुधारणांसाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था

Aug 30, 2026
कोचिंग क्लासेसचा मनमानी कारभार थांबणार? सरकारच्या नव्या मसुद्यात ५० लाखांपर्यंत दंड

कोचिंग क्लासेसचा मनमानी कारभार थांबणार? सरकारच्या नव्या मसुद्यात ५० लाखांपर्यंत दंड

महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यावसायिकीकरणाला आणि विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त शैक्षणिक दबावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नियमनाचा व्यापक आराखडा तयार केला आहे.

Aug 24, 2026
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे डांबरीकरण महिनाभरातच उखडले..

PM Gram Sadak Yojana: अतिसंवेदनशील आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागात वसलेल्या कोरची तालुक्यात कोट्यावधी किंमतीचे दोन पुल तसेच पुल वजा बंधारा वाहुन

Aug 14, 2026
कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

BJP Yuva Morcha: नगरपरिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज (वडसा) येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरची तालुक्यातील कोटगुल व परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांबाबत भाजप युवा मोर्चा

Aug 12, 2026