महाराष्ट्र मान्सून अलर्ट

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट? ऑगस्ट सर्वात कोरडा महिना; सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का? 

Maharashtra Monsoon Update: जुलैमध्ये मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर अचानक कमी झाला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्याच्या पावसाची आकडेवारी पाहता ऑगस्ट कोरडा.

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट? ऑगस्ट सर्वात कोरडा महिना; सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का? 

Maharashtra Monsoon

 

जुलैच्या मुसळधार पावसानंतर ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मंदावला
पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज

मुंबई (Maharashtra Monsoon Update) : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. जुलैमध्ये मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर अचानक कमी झाला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्याच्या पावसाची आकडेवारी पाहता, यंदाचा ऑगस्ट हा पावसाच्या तुटीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा महिना ठरला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, मुंबईत सध्या तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट

यंदा मुंबईत मोसमी पावसाचे (Maharashtra Monsoon) आगमन नेहमीपेक्षा तब्बल 13 दिवस उशिराने झाले. त्यामुळे जूनमध्ये पावसाची मोठी कमतरता निर्माण झाली होती. त्यानंतर जुलैमध्ये परिस्थितीत मोठा बदल झाला. उत्तर कोकणात मुसळधार पाऊस झाला, तर मुंबईतही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जुलैच्या पहिल्या पाच दिवसांतच कुलाबा येथे संपूर्ण महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 12 टक्के अधिक, तर सांताक्रूझ येथे 5 टक्के अधिक पाऊस नोंदवण्यात आला होता. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाची ही लय कायम राहिली नाही. सक्रिय हवामान प्रणालींचा अभाव असल्याने मुंबईत केवळ तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

संपूर्ण मोसमी हंगामात मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पाऊस

ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली असली तरी 1 जून ते 31 ऑगस्ट या संपूर्ण मोसमी कालावधीचा विचार करता मुंबईत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक (Maharashtra Monsoon) पाऊस झाला आहे. या कालावधीत सांताक्रूझ केंद्रावर सुमारे 2,216 मिमी, तर कुलाबा केंद्रावर 1,766 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या हवामान प्रणालींचा प्रभाव पुढील काही दिवसांत महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. मुंबईत पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट

मुंबईतील पाणीसाठ्याची (Maharashtra Monsoon) स्थिती समाधानकारक असली, तरी राज्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. ऑगस्टमध्येही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांतील पावसाची तूट आणखी वाढली आहे. राज्यातील काही भागांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये तरी चांगला पाऊस होणार का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सप्टेंबरमध्ये पावसाची तूट भरून निघणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी आणि गुरुवारी (Maharashtra Monsoon) विदर्भातील अनेक भागांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, संपूर्ण राज्यात व्यापक आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्याशिवाय सध्याची पावसाची तूट भरून काढणे कठीण असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढल्यास ऑगस्टच्या तुलनेत राज्याला काहीसा दिलासा मिळू शकतो.

 

संबंधित सामग्री

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

Sep 28, 2026