महाराष्ट्र मान्सून

सप्टेंबरमध्येच मान्सूनचा निरोप; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा सुरु होणार?

Maharashtra Monsoon: यंदाचा मान्सून हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला असून, लवकरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 17 सप्टेंबरच्या आसपास मान्सून माघारी फिरण्यास सुरु

सप्टेंबरमध्येच मान्सूनचा निरोप; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा सुरु होणार?

Maharashtra Monsoon

 

पावसाची सरासरी केवळ 91 टक्के राहण्याचा अंदाज; तापमानात वाढ होण्याची शक्यता

पुणे (Maharashtra Monsoon) : यंदाचा मान्सून हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला असून, लवकरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 17 सप्टेंबरच्या आसपास मान्सून पूर्व राजस्थानातून माघारी फिरण्यास सुरुवात करतो, तर महाराष्ट्रातून सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा निरोप होण्याची शक्यता असते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच पावसाचे प्रमाण कमी राहण्यासोबत तापमानात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) सप्टेंबर महिन्यासाठी मान्सूनचा अंदाज जाहीर केला असून, यंदा या (Maharashtra Monsoon) महिन्यात सरासरीच्या सुमारे 91 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती फारशी समाधानकारक राहणार नसल्याचे चित्र आहे.

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’?

सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास ढगाळ वातावरण कमी होऊन सूर्यप्रकाशाचा प्रभाव वाढू शकतो. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी ऑक्टोबरमध्ये जाणवणारी ‘ऑक्टोबर हीट’ यंदा सप्टेंबरमध्येच जाणवण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Monsoon) पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता आणि तापमान यांचा परिणाम नागरिकांना जाणवू शकतो. विशेषतः दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास कधी?

सामान्यतः मान्सूनचा (Maharashtra Monsoon) परतीचा प्रवास 17 सप्टेंबरच्या आसपास पूर्व राजस्थानातून सुरू होतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर भागांतून मान्सून माघारी फिरतो. महाराष्ट्रातून मान्सूनची माघार साधारणपणे सप्टेंबरअखेर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असते. यंदा सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही पोषक वातावरण निर्माण होऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा काळ

सप्टेंबरमधील पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा असतो. खरीप पिकांच्या वाढीसाठी या काळातील पाऊस निर्णायक ठरतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास काही भागांतील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तापमान वाढल्यास जमिनीतील ओलावाही वेगाने कमी होऊ शकतो. त्यामुळे (Maharashtra Monsoon) मान्सूनचा उर्वरित काळ, सप्टेंबरमधील पावसाचे प्रमाण आणि तापमानातील वाढ याकडे शेतकरी तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

Sep 28, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026