CM देवेंद्र फडणवीस

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis

मुंबई (CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली  खारघर, नवी मुंबई येथील सिडकोच्या जागेवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र उभे राहिले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

श्री सत्य साई संजीवनी केंद्रामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ञांकडून एकूण 2507 टू-डी-इको तपासण्या करण्यात आल्या. तसेच जन्मजात हृदयरोग (CHD) उपचारासाठी राज्यभरातील आरबीएसके पथकांमार्फत 3226 बालकांवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र येथे उपचार करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या निर्देशानुसार श्री सत्य साई संजीवनी केंद्रांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या आदिवासी बहुल तालुक्यांना दत्तक घेऊन तेथे विशेष आरोग्य उपक्रम राबविले. तसेच पुण्यातील शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात आल्या. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आरोग्य सेवा पोहचविण्यात येत आहेत.

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बालकांमधील जन्मजात हृदयरोग तपासणीसाठी मेगा शिबिरे सुरू असून, दुर्गम भागातील बालकांनाही अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई येथे बांधकाम कामगार तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी नॉन-कम्युनिकेबल डिसीज (NCD) आणि कर्करोग तपासणी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.

याशिवाय, आजपर्यंत आशा, अंगणवाडी सेविका, सहाय्यक परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी अशा 3500 हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना क्षमता विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026