महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case

मुंबई (MPSC Paper Leak Case) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवून माजी अध्यक्षांसह दोन वेळा हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ (Dr. Abhay Wagh) यांचीही चौकशी करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

आयोगाचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पेपरफुटीच्या कालावधीत आपण अध्यक्षपदावर नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करणे, संबंधित तज्ज्ञांची निवड आणि छपाईसाठी प्रश्नपत्रिका पाठविण्याची प्रक्रिया ज्या कालावधीत झाली, त्या काळातील निर्णयप्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

दोन कार्यकाळात महत्त्वाची प्रक्रिया

डॉ. अभय वाघ (Dr. Abhay Wagh) यांनी सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 तसेच डिसेंबर 2025 ते 3 मार्च 2026 या दोन कालखंडात हंगामी अध्यक्ष म्हणून आयोगाची धुरा सांभाळली होती. उपलब्ध माहितीनुसार, औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित विविध प्रक्रिया याच कालावधीशी जोडल्या जात असल्याने त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. औषध निरीक्षक पदाची परीक्षा 22 मार्च रोजी घेण्यात आली. त्यानंतर 12 जूनला निकाल जाहीर करण्यात आला आणि 506 उमेदवार पात्र ठरले. पुढे 1 ते 22 जुलैदरम्यान 488 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

मात्र, 22 ते 26 जुलैदरम्यान प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांना मिळाल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत अखेर २६ ऑगस्ट रोजी परीक्षा आणि भरती प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या तपासाला महत्त्व

या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान (MPSC Paper Leak Case) आयोगाच्या गोपनीय प्रश्नपत्रिका संचातून प्रश्न चोरी केल्याचा आरोप काही अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. आयोगातील अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे यांच्याबाबतही तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रश्नपत्रिका काही उमेदवारांना आधीच मिळाल्याचा दावा करणाऱ्या तक्रारी ई-मेलद्वारे आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते छपाई आणि सुरक्षितपणे पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

सचिवांच्या बदल्यांमुळेही चर्चा

दरम्यान, (MPSC Paper Leak Case) आयोगातील सचिवपदाशी संबंधित घडामोडींमुळेही या प्रकरणाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सप्टेंबर 2025 मध्ये सचिव सुवर्णा खरात यांची बदली झाली. त्यानंतर जगन्नाथ विरकर यांनी सचिवपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यातच 2 ऑक्टोबर रोजी महेंद्र हरपाळकर यांची बदली झाल्याने सचिवपद पुन्हा रिक्त झाले आहे. या सलग घडामोडींचा पेपरफुटी प्रकरणाशी थेट संबंध आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

डॉ. वाघ यांचा आयोगातील कार्यकाळ

डॉ. अभय वाघ (Dr. Abhay Wagh) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी जानेवारी 2023 मध्ये नियुक्ती झाली असून त्यांचा कार्यकाळ मे २०२८पर्यंत आहे. यापूर्वी त्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पेपरफुटीच्या प्रकरणामुळे आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता, प्रश्नपत्रिका निर्मिती आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित काळातील सर्व निर्णय, अधिकाऱ्यांची भूमिका आणि प्रश्नपत्रिका हाताळणीची साखळी तपासणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न

परीक्षा रद्द झाल्याने हजारो उमेदवारांच्या मेहनतीवर परिणाम झाला असून त्यांच्या भवितव्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पेपरफुटी नेमकी कोणत्या टप्प्यावर झाली, त्यामागे कोण होते आणि गोपनीय यंत्रणेत कुठे त्रुटी राहिली, याचा सखोल तपास होणे अपेक्षित आहे. गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे येणाऱ्या निष्कर्षांवर या संपूर्ण प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026