Liquor Brands

ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स अडचणीत; FSSAI च्या कारवाईमागे काय कारण?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांबाबत नियमभंगाच्या आरोपांवर कारवाई केली आहे.

ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स अडचणीत; FSSAI च्या कारवाईमागे काय कारण?

ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यूच्या काही उत्पादनांबाबत कारवाई; कृत्रिम फ्लेवरिंगच्या वापरावर आक्षेप

मुंबई : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांबाबत नियमभंगाच्या आरोपांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यू या ब्रँड्सच्या काही उत्पादनांचा समावेश असल्याने मद्य उद्योगात चर्चा सुरू झाली आहे.

FSSAI च्या तपासात काही उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरीत्या परिपक्व (Aged) झाल्यासारखा स्वाद आणि सुगंध मिळावा यासाठी कृत्रिम अथवा "Nature Identical" फ्लेवरिंगचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नियामक संस्थेच्या नियमांनुसार रम, व्हिस्की, ब्रँडी आणि जिन यांसारख्या मद्यांमध्ये त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण स्वाद आणि सुगंध हा उत्पादन प्रक्रियेतील मूळ घटकांमधून निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कृत्रिम फ्लेवरिंगचा वापर नियमांशी विसंगत असल्याचा आक्षेप FSSAI ने नोंदवला आहे.

तथापि, ही कारवाई संबंधित ब्रँड्सच्या सर्व बाटल्यांवर किंवा देशभरातील सर्व उत्पादन केंद्रांवर लागू आहे की केवळ काही विशिष्ट उत्पादन केंद्रांपुरती मर्यादित आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

कारवाईच्या कक्षेत असलेली काही उत्पादने

  • ओल्ड मॉन्क (Old Monk) – काही व्हेरियंट्स
  • मॅकडॉवेल्स (McDowell's No.1 Rum)
  • बॅगपाइपर (Bagpiper Deluxe Whisky)
  • रॉयल चॅलेंज (Royal Challenge Whisky)
  • अँटीक्विटी ब्ल्यू (Antiquity Blue Whisky)

FSSAI ने नोंदवलेले प्रमुख आक्षेप

  • विक्रीस मनाई केलेली काही उत्पादने सुमार दर्जाची तसेच दिशाभूल करणारी असल्याचा आरोप.
  • रम किंवा व्हिस्की मूळ घटकांऐवजी फ्लेवरिंगच्या साहाय्याने तयार केल्याचा आक्षेप.
  • कृत्रिम फ्लेवरिंगमुळे उत्पादनाची मूळ चव आणि सुगंध बदलल्याचे निरीक्षण.
  • मोलेससपासून रम किंवा माल्टपासून व्हिस्की तयार करण्याऐवजी फ्लेवरिंग वापरल्याने मूळ वैशिष्ट्यांवर परिणाम झाल्याचा दावा.
  • उत्पादन कोणत्या घटकांपासून तयार केले आहे, याचा स्पष्ट उल्लेख लेबलवर नसल्याचा मुद्दा.
  • अशी उत्पादने "Rum Flavoured Spirit" किंवा "Whisky Flavoured Spirit" या स्वरूपात विक्रीस ठेवणे अपेक्षित असल्याचे नमूद.

कंपन्यांची भूमिका

या कारवाईनंतर संबंधित उत्पादनांची विक्री काही ठिकाणी तात्पुरती थांबवली जाऊ शकते. अंतिम न्यायालयीन किंवा नियामक निर्णय येईपर्यंत परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संबंधित कंपन्यांनी आपण नियमांचे पालन केल्याचा दावा केला असून काही कंपन्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या मते हा वाद उत्पादनाच्या सुरक्षिततेपेक्षा नियमांच्या व्याख्येशी संबंधित आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

India captain Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी कर्णधार मिळाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्मृती मंधानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026