मुंबईसह राज्यभरात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल्स, कॅन्टीन, रुग्णालये आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी केली जात आहे. याच मोहिमेदरम्यान मुंबईतील प्रसिद्ध **‘सूरज लामा मोमोज’**च्या अंधेरी येथील मुख्य आउटलेटसह आठ खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, FDAच्या तपासणीत या आठ आस्थापनांमध्ये अन्न हाताळणी आणि साठवणुकीच्या पद्धती, स्वच्छता तसेच आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्या. अन्न दूषित होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये कमतरता आढळल्याने संबंधित नियमांनुसार परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
(Below are Country Club, Andheri West pics) Food licence action against 8 Mumbai establishments after inspections: The five establishments whose food licences have been suspended by FDA are Cafe Sultan in Kalina, Lo Fresh Food Pvt Ltd in Marol, Country Club and Suraj Lama Momos in Andheri West, and Cafe Pakeezah in Santacruz West. According to the inspection findings, the establishments failed to meet prescribed hygiene and health requirements, with lapses reported in areas including food preparation and handling, storage, cleanliness of premises and preventive measures against contamination. Country Club was found to have violations relating to food handling, cleanliness and safe storage, while Suraj Lama Momos was found lacking in cleanliness during food preparation, handling and storage. Cafe Pakeezah was similarly found to have deficiencies in food handling, storage and premises cleanliness.
— Richa Pinto (@richapintoi) October 5, 2026
सूरज लामा मोमोजवर FDAची कारवाई
मुंबईतील लोकप्रिय मोमोज ब्रँडपैकी एक असलेल्या ‘सूरज लामा मोमोज’च्या अंधेरीतील मुख्य शाखेवरही या कारवाईचा परिणाम झाला आहे. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष देत FDAकडून ही तपासणी मोहीम राबवली जात आहे.
या कारवाईनंतर ‘सूरज लामा मोमोज’चे मालक सूरज लामा यांचा संघर्षमय प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सूरज लामा तब्बल २५ वर्षे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे विश्वासू ड्रायव्हर म्हणून काम करत होते.
वयाच्या १४व्या वर्षी मुंबईत आले
सूरज लामा यांनी वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी रोजगाराच्या शोधात दार्जिलिंगमधील आपले गाव सोडून मुंबई गाठली. सुरुवातीला विविध छोटी-मोठी कामे केल्यानंतर त्यांनी सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तब्बल २५ वर्षे त्यांनी बॉलिवूडमधील कलाकारांच्या गाड्या चालवल्या.
सोनाक्षी सिन्हा, शाहीद कपूर यांसारख्या कलाकारांसाठी त्यांनी ड्रायव्हर म्हणून काम केले. तसेच करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन्ससारख्या मोठ्या बॅनरसाठीही त्यांनी वाहन चालवले.
सायकलवरून मोमोज विकण्यापासून ब्रँड उभारला
ड्रायव्हर म्हणून काम करत असताना २०१७ मध्ये सूरज लामा यांनी मोमोज विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी सायकलवरून मोमोज विकण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतः तयार केलेले मोमोज सोनाक्षी सिन्हा यांनाही खाऊ घातले होते आणि त्यांना ते आवडल्याचे सांगितले जाते.
यानंतर सूरज लामा यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडून पूर्णवेळ मोमोजच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. व्यवसायाला प्रतिसाद मिळत गेल्यानंतर त्यांनी दुकान सुरू केले आणि पुढे ‘सूरज लामा मोमोज’ हा ब्रँड विस्तारला.
या व्यवसायात त्यांनी पत्नी विजयता यांनाही सहभागी करून घेतले. त्यावेळी विजयता या गायक केके यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. संघर्षातून उभा राहिलेला हा व्यवसाय पुढे प्रसिद्ध झाला; मात्र आता FDAच्या कारवाईमुळे ‘सूरज लामा मोमोज’ पुन्हा चर्चेत आला आहे.