Delhi Protest

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

Delhi Protest

खरगे यांच्या जनपथ निवासस्थानी विरोधकांची बैठक; दिल्ली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, बॅरिकेडिंग वाढवले

नवी दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या INDIA आघाडीने मंगळवारी झालेल्या पोलिस कारवाईनंतरही आपली भूमिका कायम ठेवली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी नेत्यांना आठ तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता विरोधी खासदार पुन्हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील जनपथ निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत पुढील आंदोलनाबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले आहेत. राहुल गांधी यांनी लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मांडत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

विरोधी खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. नवी दिल्लीचे DCP यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मोर्चा आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचू नये यासाठी विविध मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आली असून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा राजकीय तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

खरगेंची सरकारवर टीका

मल्लिकार्जुन खरगे यांनी जनपथ येथील निवासस्थानी INDIA आघाडीतील प्रमुख नेत्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, राजदचे खासदार मनोज झा, माकपचे जॉन ब्रिटास, झामुमोचे खासदार विजय यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत खरगे यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. देशातील नागरिकांना मिळालेल्या प्रौढ मतदानाच्या अधिकारावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त सरकारच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेनुसार निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

'FIRला घाबरत नाही'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनामुळे FIR दाखल झाली तरी काँग्रेस त्याला घाबरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट FIR होणे ही सन्मानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील पुढील घडामोडींकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मंगळवारी रात्री राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही INDIA आघाडीने आंदोलन मागे घेतलेले नाही. त्यामुळे आज पुन्हा विरोधक निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढतात का आणि पोलिसांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026