मराठा आरक्षण लातूर बंद

मराठा आरक्षणासाठी लातूर बंद; मोटारसायकल रॅलीतून बंदचे आवाहन

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गुरुवारी (दि.३)  सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला लातूर

मराठा आरक्षणासाठी लातूर बंद; मोटारसायकल रॅलीतून बंदचे आवाहन

Maratha Reservation

 

बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये बंद

लातूर (Maratha Reservation) : मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गुरुवारी (दि.३)  सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला लातूर शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्याने नेहमी गजबजणारे लातूर अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजबांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. प्रारंभी त्यांनी छत्रपती  शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवरायांचा जयजयकार तसेच मनोज जरांगे पाटील आणि (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहरात मोटारसायकल रॅली काढून शहरातील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग,  आणि खासगी आस्थापनांनीही बंदला प्रतिसाद दिला. बंदची पूर्वकल्पना असल्याने शहरातील शाळा भरल्या नव्हत्या. रस्त्यांवर स्कूल बसही दिसल्या नाहीत. महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट होता. एरवी गजबजणाऱ्या आडत बाजारातही सामसूम होती. बाजार समितीत सौदे निघू शकले नाहीत.
दरम्यान दुपारी समाजबांधव मोठ्या संख्येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुन्हा एकत्र आले व त्यांनी तेथे बैठक देत आपल्या भावनांना वाट करुन दिली. (Maratha Reservation) मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेकांना संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे. पाल्यांचे शिक्षण, मुलींची लग्ने, वाढते कर्ज, नापिकी आणि व्यवस्थेकडून होणारी अडवणूक यामुळे समाज खचला आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा!
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. आता शासनाने अंत पाहू नये, अन्यथा समाजाचा संयम सुटेल व यापुढे मंत्री, लोकप्रतिनीधींच्या घरासमोरही आंदोलने होतील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान बंद शांततेत पार पडावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. पोलिस प्रशासनानेही शहरभर मोठा बंदोबस्त तैनात केला होता.  

सर्वांच्या सहकार्याबद्दल मानली कृतज्ञता
शहरासह जिल्ह्यात सर्व स्तरांतून मिळालेल्या प्रतिसादामुळे बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा सकल मराठा समाजाने केला. बंदला सहकार्य करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था नागरिक अशा सर्वांप्रति समाजबांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित सामग्री

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

Maratha reservation Suicide Case: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाचा प्रवाह सुरू असतानाच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना

Sep 21, 2026
जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी फडणवीसांनी जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य असल्याचे सांगितले. दुष्काळ, शेतकरी आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Sep 17, 2026
मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण मागे घेत सरकारला मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी ९० दिवसांची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

Sep 17, 2026
मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले असताना शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय.

Sep 16, 2026
‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा आहे. या १२ मागण्या तातडीने सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Sep 16, 2026