देशात उष्ण तापमान

125 वर्षांनंतर पुन्हा संकट! देशात उष्णतेचा कहर, पावसाची 16% तूट

India Heatwave: सप्टेंबर महिन्यात पावसाचे फार आशादायी चित्र नसल्याचे म्हटले जात आहे. तर काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. सुमारे 125 वर्षांनी देशात अशी परिस्थिती पुन्हा..

125 वर्षांनंतर पुन्हा संकट! देशात उष्णतेचा कहर, पावसाची 16% तूट

India Heatwave

सामान्यपेक्षा कमी पाऊस; देशभरात तापमानाचा पारा चढला..

पुणे (India Heatwave) : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात एल निनोचा प्रभाव जाणवत असल्याचे चित्र आहे. देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, सप्टेंबर महिन्यातही पावसाचे फारसे आशादायी चित्र नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता असली तरी देशाच्या अनेक भागांत पावसाची तूट (India Heatwave) कायम राहण्याची शक्यता आहे. सुमारे 125 वर्षांनंतर देशात अशाच प्रकारची हवामान परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट

ऑगस्ट महिन्यात देशभरात एकूण 213.3 मिमी पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत 16.3 टक्क्यांनी कमी आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिना नेहमीपेक्षा अधिक उष्ण राहिला. ऑगस्टमधील सरासरी किमान तापमान 24.36 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे 1901 नंतरचे सर्वाधिक किमान तापमान असल्याचे सांगण्यात आले आहे. तर (India Heatwave) सरासरी कमाल तापमान 28.01 अंश सेल्सिअस राहिले असून, हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान ठरले आहे.

सप्टेंबरमध्येही पावसाची चिंता

ऑगस्टमध्ये कमकुवत राहिलेला मान्सून सप्टेंबरमध्येही पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजातून दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि अधिक उष्णता राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबरसाठी देशातील सामान्य पर्जन्यमान 167.9 मिमी आहे. मात्र, यंदा देशाच्या अनेक भागांत त्यापेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील काही भागांत मात्र आगामी काळात पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक तसेच जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, सध्या कोणत्याही जिल्ह्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही.

याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोमुळे जगभरात ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज असून भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता. महाराष्ट्रातही १००% दुष्काळाचा इशारा.

Sep 24, 2026
महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट? ऑगस्ट सर्वात कोरडा महिना; सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का? 

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट? ऑगस्ट सर्वात कोरडा महिना; सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का? 

Maharashtra Monsoon Update: जुलैमध्ये मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर अचानक कमी झाला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्याच्या पावसाची आकडेवारी पाहता ऑगस्ट कोरडा.

Sep 02, 2026
मान्सूनवर चक्रीवादळांचं संकट? ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’मुळे पावसात ब्रेकची शक्यता

मान्सूनवर चक्रीवादळांचं संकट? ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’मुळे पावसात ब्रेकची शक्यता

भारतामध्ये मान्सूनचा प्रवास सुरू असतानाच प्रशांत महासागरातील दोन शक्तिशाली चक्रीवादळांनी हवामान तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Aug 10, 2026
महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; पुढील 10 दिवस पावसाचा जोर कमी

महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; पुढील 10 दिवस पावसाचा जोर कमी

Maharashtra Heavy Rainfall: मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम

Jul 07, 2026