लाचखोर एसीबी जाळ्यात

वर्षभरात तब्बल 683 लाचखोर अडकले `एसीबी`च्या जाळ्यात

Bribery ACB Action: र्षभरात लाचखोरीबाबत ४७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात ६८३ लाचखोर अडकले आहेत. यात ५१ `क्लास वन` तसेच ८५ `क्लास टू` अधिकार्‍यांचा समावेश आहे.

वर्षभरात तब्बल 683 लाचखोर अडकले `एसीबी`च्या जाळ्यात

Bribery ACB Action

५१ `क्लास वन`, ८५ `क्लास टू`चा समावेश

मुंबई/ वर्धा (Bribery ACB Action) : वर्षभरात लाचखोरीबाबत ४७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात ६८३ लाचखोर अडकले आहेत. यात ५१ `क्लास वन` तसेच ८५ `क्लास टू` अधिकार्‍यांचा समावेश आहे. लाचखोरीची रक्कम २ कोटी ८१ लाख १० हजार ७९० रुपये असल्याचे एसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे.

लाचलूचपत विभागाने कारवाई केलेली २०१४ ते २०२६ पर्यंतची २१७ प्रकरणे संबंधितांना निलंबीत करण्याकरीता पाठविली होती पण या लाचखोरांवर अद्याप कोठलीही कारवाई झालेली नाही. त्यात ३७ क्लास वन, ४४ क्लास टू, १२५ क्लास थ्री तसेच इतर ११ जणांचा समावेश आहे. सगळ्यात कहर म्हणजे २०१३ ते २०२६ या कालावधीत लाचखोरीच्या गुन्ह्यात शिक्षा होऊनही बडतर्फीची कारवाई न झालेले २८ लाचखोर अद्यापही मोकाट असल्याची माहिती समोर येत आहे.

शासनाकडे लाचखोरी संबंधातील १०८, सक्षम अधिकार्‍याकडे विभागनिहाय चौकशीचे ३४८, अशी एकूण ४५६ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात प्रकरणे सादर करून ९० दिवसांपेक्षा कमी कालावधी झालेल्या ९६ तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या ३६० प्रकरणांचा समावेश आहे. त्यात पोलिस खात्यातील ८७, महसूल खात्यातील ४७, नगरविकास खात्यातील ४६, ग्रामविकास खात्यातील ४३, शिक्षण विभागातील ३७, आरोग्य विभागातील १५, सहकार आणि पणन विभागातील १२, कृषी विभागातील ८ प्रकरणांचा समावेश आहे.

मुंबई विभागात लाचखोरीची २२ प्रकरणे (Bribery ACB Action) दाखल होत त्यातील आरोपींची संख्या ३४ आहे. ठाणे विभागातील ६१ प्रकरणातल्या आरोपींची संख्या ८५, पुणे विभागातील ८६ गुन्ह्यात आरोपींची संख्या १२१, नाशिक विभागातील १०६ गुन्ह्यात आरोपींची संख्या १७१, नागपूर विभागातील ४३ गुन्ह्यात आरोपींची संख्या ६२, अमरावती विभागातील ४७ गुन्ह्यातल्या आरोपींची संख्या ६५, छत्रपती संभाजीनगर विभागातील ७३ गुन्ह्यातील आरोपींची संख्या ९७, नांदेड विभागातील ३७ गुन्ह्यातील आरोपींची संख्या ४८, अशा एकूण ४७५ गुन्ह्यांतील आरोपींची संख्या ६८३ सांगितली गेली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार मागील १० वर्षांत ९ हजार १२३ जण लाच घेण्याच्या सापळ्यात अडकले.

संबंधित सामग्री

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीत २० वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाचा आपसी तडजोडीतून निपटारा

राष्ट्रीय लोक अदालतीत २० वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाचा आपसी तडजोडीतून निपटारा

मानोरा येथील राष्ट्रीय लोक अदालतीत २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या म्हसणी येथील दिवाणी वादासह अनेक प्रकरणांचा आपसी तडजोडीतून निपटारा करण्यात आला.

Sep 12, 2026
न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित असताना न्यायव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Sep 05, 2026
संजय गांधी निराधार, श्रावण बाळ व दिव्यांग अनुदानाच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा; शिवसेना (उबाठा)ची मागणी

संजय गांधी निराधार, श्रावण बाळ व दिव्यांग अनुदानाच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा; शिवसेना (उबाठा)ची मागणी

शिवसेना (उबाठा)ला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Jul 06, 2026
तारीख पे तारीख...

तारीख पे तारीख...

भारतीय न्यायालयाने सुनावणीच्या विलंबावर नियंत्रणासाठी नवीन नियमावली जाहीर केली. यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

Apr 04, 2026