Doctors Strike

होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी; सरकारच्या GR विरोधात राज्यभर डॉक्टरांचा २४ तासांचा संप

होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करून ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देणारा शासन निर्णय (GR) राज्य सरकारने जारी केला आहे.

होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी; सरकारच्या GR विरोधात राज्यभर डॉक्टरांचा २४ तासांचा संप

Doctors Strike

CCMP कोर्सधारकांना MMC नोंदणीनंतर ॲलोपॅथी औषधे लिहिण्याचा निर्णय; IMA, MARD आणि अन्य वैद्यकीय संघटनांचा तीव्र विरोध

मॉडर्न फार्मकोलॉजी (CCMP) प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करून ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देणारा शासन निर्णय (GR) राज्य सरकारने जारी केला आहे. या निर्णयाला राज्यभरातील ॲलोपॅथिक (MBBS/MD) डॉक्टरांनी तीव्र विरोध दर्शवत २४ तासांच्या कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे.

सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड, नागपूर, पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तसेच विविध वैद्यकीय संघटनांच्या मते, केवळ एक वर्षाचा CCMP अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी उपचारांची परवानगी देणे योग्य नाही. पाच ते सहा वर्षांचे कठोर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या MBBS आणि MD डॉक्टरांवर हा अन्याय असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. तसेच या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाने GR मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

नागपुरात सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतली. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. नांदेडमध्येही डॉक्टर रस्त्यावर उतरले असून शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले.

IMA ने दिलेल्या २४ तासांच्या कामबंद आंदोलनाला महाराष्ट्र मार्ड (MARD), एएसएमआय (ASMI) तसेच इतर वैद्यकीय संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निर्णयावरून राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 06, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026