चारधाम यात्रा विक्रम

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record

 

2023 मधील सर्वाधिक भाविकांच्या संख्येचा विक्रम मोडला
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला मोठी गर्दी

देहरादून (Chardham Yatra Record) : उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेने यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत 56 लाख 18 हजार 497 हून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असून, यासह 2023 मध्ये नोंदविण्यात आलेला सर्वाधिक भाविकसंख्येचा विक्रमही मागे पडला आहे.

यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उत्तराखंडमध्ये दाखल झाले. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक (Chardham Yatra Record) आणि आध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

यात्रा व्यवस्थेत विविध सुविधा

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) यांच्या नेतृत्वाखाली चारधाम यात्रा सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी विविध स्तरांवर व्यवस्था बळकट करण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. यात्रा मार्गांवरील आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पार्किंग, निवास व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

यात्रेदरम्यान प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि एसडीआरएफसह संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाविकांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

केदारनाथ-बद्रीनाथमधील सुविधांचा फायदा

सरकारच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली (Chardham Yatra Record) केदारनाथ, बद्रीनाथसह उत्तराखंडमधील प्रमुख धार्मिक स्थळांवर पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. दळणवळणाची सुविधा आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या विकासकामांमुळे चारधाम यात्रेला अधिक बळ मिळाले, असे सरकारकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री धामी म्हणाले, ‘प्रत्येक भाविक आमचा अतिथी’

चारधाम यात्रेने (Chardham Yatra Record) नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आनंद व्यक्त केला. उत्तराखंडमध्ये येणारा प्रत्येक भाविक हा राज्याचा अतिथी आहे, असे त्यांनी म्हटले. भाविकांची यात्रा सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावी, हा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. चारधाम यात्रेतील भाविकांची विक्रमी संख्या ही यात्रेच्या सुविधांबाबत वाढलेला विश्वास आणि धार्मिक पर्यटनाच्या वाढत्या आकर्षणाचे द्योतक असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी नमूद केले.

संबंधित सामग्री

उज्जैनच्या शाही मशिदीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

उज्जैनच्या शाही मशिदीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

उज्जैनच्या शाही मशिदीचा भाग हटवण्यावरून आंदोलन, दगडफेक आणि तणाव. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा चर्चेत.

Sep 28, 2026
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

Sep 28, 2026
खर्गे यांच्या अवमानाविरोधात आणि राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये संविधान मार्च

खर्गे यांच्या अवमानाविरोधात आणि राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये संविधान मार्च

लातूरमध्ये राहुल गांधींवरील कारवाई आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या अवमानाच्या निषेधार्थ काँग्रेस, महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांकडून आज संविधान मार्च.

Sep 07, 2026
मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी;  तिघांचा बचाव

मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी; तिघांचा बचाव

नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या चार मुलांना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याची घटना घडली.

Sep 05, 2026
शेलसूरचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे कर्तव्य बजावताना शहीद

शेलसूरचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे कर्तव्य बजावताना शहीद

Martyr Haridas Kapse: अतिउंचावरील (हाय अल्टीट्यूड) अतिशय कठीण भागात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना प्राणवायूची (ऑक्सिजन) पातळी खालावल्याने हृदयविकाराचा तीव्र त्रास होऊन हवालदार हरिदास मधुकर कापसे

Aug 10, 2026