लातूर आरोग्य उपकेंद्र

वर्षभरापासून 15 आरोग्य उपकेंद्रे वाऱ्यावर!

Latur Health Sub-centre: लातूर जिल्ह्यातील जवळपास 15 आरोग्य उपकेंद्रांमधील डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागात रुग्णवाहतुकीची काळजी पडली आहे. सरकार आणि जिल्हा परिषद

वर्षभरापासून 15 आरोग्य उपकेंद्रे वाऱ्यावर!

Latur Health Sub-centre

 

डॉक्टरांच्या रिक्त जागांसाठी ना सरकार गंभीर, ना जिल्हा परिषद!

महादेव कुंभार
लातूर (Latur Health Sub-centre) :
लातूर जिल्ह्यातील जवळपास 15 आरोग्य उपकेंद्रांमधील डॉक्टरांच्या जागा वर्षभरापासून रिक्त असून यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यवस्था कोलमडली आहे. लातूरच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या जागा भरण्याबाबत सातत्याने चालढकल केल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद आरोग्याच्या विषयावर गंभीर होणार आहे की नाही? असा सवाल केला जात आहे. 

लातूर जिल्ह्यातील (Latur Health Sub-centre) तालुक्यातील हिंगणगाव, रोकडा सावरगाव व थोडगा, औसा तालुक्यातील एकंबी टाका व कारला, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व अजनी, निलंगा तालुक्यातील तांबाळा, उस्तुरी, लांबोटा व कोकळगाव, जळकोट तालुक्यातील गुत्ती, रेणापूर तालुक्यातील कोष्टगाव आणि उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांची पदे वर्षभरापासून भरलीच नाहीत. जिल्ह्यातील जवळपास 10 आरोग्य उपकेंद्रामध्ये रिक्त असलेल्या जागांवर आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेतून काही जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र ज्यांची बदली झाली, ते या जागांवर रुजू झाले नाहीत. विशेष म्हणजे संबंधित डॉक्टर रुजू झाले नसल्याने याबाबत संबंधितांना जाब विचारावा, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाला वाटले नाही. तसेच राज्य सरकारने यातील काही जागांवर ज्यांच्या बदल्या किंवा नियुक्त केल्या होत्या तेही रुजू झाले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारचा आरोग्य विभाग ही याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जि.प. सदस्य बोलणार आहेत का?

त्यामुळे जिल्हा परिषदेने याबाबत गंभीर होण्याची वेळ आली आहे. (Latur Health Sub-centre) लातूर जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत या जागा समुपदेशनाने भरता येतात. मात्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मार्गदर्शन करण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत सदस्य बोलणार आहेत की नाही? हा खरा सवाल आहे.

संबंधित सामग्री

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेत आयुक्तांनी काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ किंवा विहित वेळेत होतच नाही, उलट आयुक्तांचे आदेश धूळ खात पडलेले असतात. हे आदेश धूळ खात पडण्यासाठी

Aug 11, 2026