रिसोड बाजार समिती

फेरभाडेपट्ट्याला मान्यता, रिसोड बाजार समितीला मिळणार दीड कोटींवर महसूल!

Risod Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोडच्या आर्थिक उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या दूरदर्शन केंद्राच्या जागेच्या फेरभाडेपट्टयाला शासनस्तरावर मान्यता मिळाली आहे.

फेरभाडेपट्ट्याला मान्यता, रिसोड बाजार समितीला मिळणार दीड कोटींवर महसूल!

Risod Bazar Samiti

रिसोड (Risod Bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोडच्या आर्थिक उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या दूरदर्शन केंद्राच्या जागेच्या फेरभाडेपट्टयाला शासनस्तरावर मान्यता मिळाली आहे. मुख्य यार्डातील दूरदर्शन केंद्रासाठी पूर्वी देण्यात आलेला जागेचा करार रद्द करून तेथील ११ भूखंड २९ वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने भाडेपट्ट्याने देण्याच्या निर्णयावर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी २५ ऑगस्ट रोजी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे बाजार समितीला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीने (Risod Bazar Samiti) दिलेल्या माहितीनुसार, सर्वे क्रमांक १०/२ मधील १० आणि सर्वे क्रमांक १०/६ मधील एक, असे ११ भूखंड नव्याने भाडेपट्टयाने देण्यात आले आहेत. नव्या करारानुसार प्रति चौरस फूट ३० रुपये भाडे आणि भूखंडानुसार दीड ते दोन लाख रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली. आतापर्यंत ५ लाख १७ हजार ७७० रुपये भाडे आणि १९ लाख २४ हजार रुपये अनामत, अशी २४ लाख ४१ हजार ७७० रुपयांची रक्कम बाजार समितीकडे जमा झाली आहे. संपूर्ण करार कालावधीत बाजार समितीला १ कोटी ५० लाख १५ हजार ३३० रुपये भाडे आणि १९ लाख २४ हजार रुपये अनामत, अशी एकूण १ कोटी ६९ लाख ३९ हजार ३३० रुपये रक्कम प्राप्त होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले.

जुन्या करारातून केवळ ६३ हजारांचे उत्पन्न मिळत होते. (Risod Bazar Samiti) बाजार समितीने २६ जून १९९५ रोजी रिसोड नगर परिषदेला ३७ बाय ४४ मीटर क्षेत्रफळाची जागा ५१ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिली होती. या कराराची मुदत २६ जून २०४६ पर्यंत होती. या जागेचे वार्षिक भाडे केवळ ३ हजार रुपये होते. त्यामुळे उर्वरित कालावधीत बाजार समितीला केवळ ६३ हजार रुपये भाडे मिळणार होते. त्याचवेळी अनामत रक्कमही निश्चित करण्यात आलेली नव्हती. या जागेवर पूर्वी दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षांपासून दूरदर्शन केंद्र बंद असल्याने जागा वापराविना पडून होती. त्यामुळे बाजार समितीने आपल्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जुन्या कराराचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला.

बाजार समितीने (Risod Bazar Samiti) यापूर्वी ही जागा नगरपरिषदेला भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र, त्यातून वर्षाला केवळ तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता नगरपरिषदेकडून जागा पुन्हा हस्तांतरित करून शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात तब्बल एक कोटी ५९ लाख रुपयांची वाढ होणार असून, त्यासोबतच शेतकरी कुटुंबातील तरुणांना व्यवसायाची संधीही मिळणार आहे.
- विष्णुपंत भुतेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड 

वाढीव उत्पन्नाचा वापर पायाभूत सुविधांसाठी (Risod Bazar Samiti) बाजार समितीच्या उपलब्ध मालमत्तेचा योग्य व परिणामकारक वापर करून समितीचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला शासनस्तरावरून मिळालेली मंजुरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वाढीव उत्पन्नाचा उपयोग बाजार समितीच्या पायाभूत सुविधा तसेच शेतकरी व व्यापारी हिताच्या विविध विकासकामांसाठी करता येणार असल्याचा मनोदय बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026