अवकाळी पाऊस व गारपीट

गव्हा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान

Unseasonal Rain: मानोरा तालुक्यातील गव्हा परिसरात २१ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकरी अशोक प्रभू राठोड यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

गव्हा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान

Unseasonal Rain

मानोरा (Unseasonal Rain) : तालुक्यातील मौजे गव्हा शिवारात दि. २१ मार्च रोजी सायंकाळच्या ३ वाजताच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी अशोक प्रभू राठोड यांच्या शेत सर्व्हे नंबर ६८ मधील शेतातील जमा केलेला हरभरा व शेतातील उभे पीक गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधीत शेतकरी कुटुंबाकडून केली जात आहे. 

सविस्तर असे की, शुक्रवारी ( दि. २१ मार्च ) रोजी सकाळपासून कडक ऊन तापत होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला व कमी प्रमाणात (Unseasonal Rain) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गारा पडायला सुरुवात झाली. सुमारे २० मिनिटे बोरा एवढ्या गारपीट झाली. या गारांचा जमिनीवर अक्षरशः सडा पडल्या. या गारपिटीत शेतकरी अशोक राठोड यांच्या शेतातील दोन एकर जमिनीवरील जमा केलेला हरभरा व अडीच एकर शेतातील उभे गहू पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीच्या मारामुळे गहू पीक आडवे पडले आहे. 

तालुक्यातील गव्हा, विठोली व चाकुर परिसरात शुक्रवारी अचानक अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेले गहू, हरभरा आदीसह संत्रा, लिंबू, आंबा, कांदा व फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने प्रशासनाला नुकसानीचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधीत शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

रोहित पवारांचा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेती नुकसानीवरून सरकारवर निशाणा. 77 हजार कोटींच्या नुकसानीचा दावा करत हेक्टरी 50 हजारांची मदत मागितली.

Sep 28, 2026
आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

Aditya Thackeray: वसमत तालुक्यातील माळवटा शिवारात शनिवारी रात्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे वसमत तालुक्यात आले होते माळवटा शिवारात त्यांनी रात्री आठ साडेआठच्या सुमारास पाहणी केली

Sep 27, 2026