हिंगोली (Farmers' Organization Protest) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने 11 जून रोजी जिंतूर-कनेरगाव नाका महामार्गावर टायर जाळून भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलकांनी सरसकट कर्जमाफी, डीएपी खताचा तात्काळ पुरवठा, विहीर व गाय गोठा अनुदानाची थकीत बिले अदा करणे आणि घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते त्वरित जमा करणे या मागण्या लावून धरल्या. याशिवाय, KTL कंपनीने सेनगाव तहसील अंतर्गत गावांतील शेतकऱ्यांचा मुरूम नेऊनही रक्कम अदा न केल्याचा व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. आंदोलनाची तीव्रता पाहता सेनगावचे नायब तहसीलदार सरोदे, हिंगोलीचे गुण नियंत्रण अधिकारी काळे आणि पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार भिंगारे यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन (Farmers' Organization Protest) स्थगित करण्यात आले.
यावेळी (Farmers' Organization Protest) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास मंत्रालय, मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, श्याम मते, विठ्ठल वायचाळ, सखाराम भाकरे, अशोक जयस्वाल, दामोदर घुमणार, बबन कांबळे, विशाल पोळ, राहुल कावरखे, मनोहर सावके, संदीप मानमोठे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जिंतूर-कनेरगाव नाक्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन
Farmers' Organization Protest: जिंतूर-कनेरगाव नाका महामार्गावर शेतकर्यांच्या नेत्यांनी टायर जाळून रस्ता रोकणारा आंदोलन सुरू. मागण्या вклюित: कर्जीमा, डेअपी खत पुरवठा, गाय गोठा अनुदान
Farmers' Organization Protest
संबंधित सामग्री
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्यांचा तीव्र विरोध
Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्यांचा तीव्र विरोध
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!
औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न
फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.
दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न
फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले
सिंदगी येथे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणीला शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध; मोजणी न करताच महसूल विभागाचे पथक परतले.