खरीप हंगाम बोगस बियाणे

खरीप हंगामात बोगस बियाण्यांपासून राहा सावध! खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Kharif season bogus seeds: खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस किंवा गुणवत्ता नाकारलेले बियाणे विकले जाण्याचा धोका आहे. तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी सतर्क राहण्याच्या १० काळजींची माहिती

खरीप हंगामात बोगस बियाण्यांपासून राहा सावध! खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Kharif season bogus seeds

 

तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांचे आवाहन

कोरची (Kharif season bogus seeds) : खरीप हंगामाची लगबग आता सर्वत्र सुरू झाली असून, शेतकरी बांधव शेतीची मशागत पूर्ण करून बियाणे व खते खरेदीच्या तयारीत गुंतले आहेत. मात्र, बाजारपेठेत अनेकदा बोगस किंवा निकृष्ट दर्जाचे बियाणे विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी (Kharif season bogus seeds) करताना अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यांची पीक उत्पादकता उत्तम राहावी, यासाठी बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत कृषी विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

बियाणे खरेदी करताना 'या' १० गोष्टींची घ्या काळजी:

अधिकृत केंद्रामधूनच खरेदी करा: बियाणे नेहमी परवानाधारक आणि अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावे. रस्त्यावरील किंवा अनधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करणे टाळावे. पक्के बिल (पावती) आवर्जून घ्या: बियाणे खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून पक्के बिल (Cash Memo) नक्की मागून घ्या. या बिलावर शेतकऱ्याचे नाव, पिकाचे नाव, वाण (व्हरायटी), लॉट नंबर, कंपनीचे नाव, किंमत आणि विक्रेत्याची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे.
​
सीलबंद पिशवी तपासा: बियाण्याची पिशवी किंवा पाकीट पूर्णपणे सीलबंद (Seal) असल्याची खात्री करा. फाटलेले, शिवलेले किंवा पुनर्रचित केलेले पाकीट अजिबात घेऊ नका.
​मुदत संपल्याची तारीख (Expiry Date) पहा: बियाण्याच्या वेष्टनावर (Tags) दिलेली पॅकिंगची तारीख आणि अंतिम मुदतीची तारीख (Expiry Date) नक्की तपासून पहा.
​वेष्टन आणि टॅग सांभाळून ठेवा: बियाणे पेरणी (Kharif season bogus seeds) झाल्यानंतरही त्या बियाण्याचे रिकामे पाकीट/पिशवी आणि त्यावरील मूळ टॅग तसेच खरेदीचे बिल पीक काढणी होईपर्यंत जपून ठेवावे. भविष्यात काही तक्रार उद्भवल्यास हा सर्वात मोठा पुरावा असतो.

​थोडं बियाणे राखून ठेवा: पेरणीपूर्वी पाकिटातील थोडे बियाणे (साधारण मूठभर) नमुना म्हणून बाजूला ठेवून द्यावे, जेणेकरून उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची तपासणी करता येईल.

​"फसवणूक टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे" – नागेश मिसाळ
​"शेतकऱ्यांनी कोणत्याही अवाजवी जाहिरातींना किंवा कमिशनच्या अमिषाला बळी न पडता अधिकृत कंपन्यांचेच बियाणे खरेदी करावे. अनधिकृतपणे छुप्या पद्धतीने विक्री होणाऱ्या  बियाण्यांची खरेदी करू नये. बियाणे खरेदीचे पक्के बिल हा शेतकऱ्याचा हक्क आहे. जर कोणत्याही कृषी सेवा केंद्राने बिल देण्यास नकार दिला किंवा बियाण्याबाबत शंका आल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा."
-नागेश मिसाळ (तालुका कृषी अधिकारी)

​उगवण क्षमता घरच्या घरी तपासा:
​कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, बियाणे बाजारातून आणल्यानंतर थेट शेतात पेरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता (Germination Test) घरच्या घरी गोणपाटावर किंवा पेपरवर तपासून पहावी. ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असेल, तरच ते बियाणे शेतात पेरावे, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आणि योग्य काळजी घेऊनच बियाण्यांची निवड करावी, जेणेकरून यंदाचा खरीप हंगाम अधिक उत्पादनक्षम आणि फायद्याचा ठरेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान असल्यास गाव दुष्काळी घोषित होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान असल्यास गाव दुष्काळी घोषित होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मूल्यांकनासाठी सुधारित निकष; पर्जन्यमानासोबत पीकनुकसान, मृदा आर्द्रता, भूजल पातळी व इतर घटकांचा विचार होणार.

Sep 22, 2026
ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

ईसापूर धरणात यंदा ६८.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा; गतवर्षी ९९.०१ टक्के होता. कमी पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Sep 21, 2026
बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाची लूट; प्रति बॅग नुसार अधिकारी पैसे घेतात, रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप 

बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाची लूट; प्रति बॅग नुसार अधिकारी पैसे घेतात, रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप 

Bogus seed case: प्रति बॅग नुसार पैसे घेऊनच विभागातील अधिकारी कारवाई टाळत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Aug 05, 2026