Rohingya

बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जणांच्या मृत्यूची भीती, बचावकार्य सुरू

म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागातून स्थलांतर करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट ओढावले आहे.

बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जणांच्या मृत्यूची भीती, बचावकार्य सुरू

Rohingya

म्यानमारच्या राखाइन राज्यातून निघालेल्या दोन बोटी समुद्रात दुर्घटनाग्रस्त; UNHCR आणि IOM कडून तीव्र चिंता व्यक्त

म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागातून स्थलांतर करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट ओढावले आहे. बंगालच्या उपसागरात दोन बोटी उलटल्याच्या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांची निर्वासित संस्था (UNHCR) आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना (IOM) यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून, समुद्रात बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या पश्चिम राखाइन राज्यातून निघाल्या होत्या. या बोटीतील सर्व प्रवासी रोहिंग्या समुदायातील असून, त्यापैकी काहींनी बांगलादेश सीमेवरून प्रवास सुरू केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे आणि उंच लाटांमुळे दोन्ही बोटी उलटल्या. या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

IOM आणि UNHCR यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, पहिल्या बोटीत २५० प्रवासी होते. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच या बोटीचा संपर्क तुटला. तर ८ जुलै रोजी म्यानमारमधील इरावदी किनाऱ्याजवळ सुमारे २८० जणांना घेऊन जाणारी दुसरी बोट उलटल्याचा अंदाज आहे.

दोन्ही बोटींमधील मिळून ५३० जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनास्थळी बचाव पथके कार्यरत असून, अनेक मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

संबंधित सामग्री

भारत-म्यानमार सीमेवर मोठा हल्ला; एका जवानाचा मृत्यू, चार जवान जखमी

भारत-म्यानमार सीमेवर मोठा हल्ला; एका जवानाचा मृत्यू, चार जवान जखमी

India-Myanmar Border Attack: अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर मंगळवारी सकाळी आसाम रायफल्सच्या गस्ती पथकावर संशयित सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका जवान मृत्यू

Sep 29, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026
परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 27, 2026
LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

Sep 21, 2026
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २३ सप्टेंबरपासून विदर्भात पावसाची शक्यता. २४-२५ सप्टेंबरला चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

Sep 21, 2026