नीटमध्ये ६०० गुणांचा गेम ?

NEET UG 2026 वर संशयाचे सावट

राजस्थान पोलिसांच्या एसओजी तपासात NEET UG 2026 पेपरफुटीच्या संशयाने धक्कादायक माहिती समोर आली. गेस पेपरच्या प्रसिद्धीने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

NEET UG 2026  वर संशयाचे सावट

शिक्षणविशेष


NEET UG 2026 परीक्षेभोवती मोठा वाद निर्माण झाला असून, पेपरफुटीच्या संशयाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. राजस्थान पोलिसांच्या Rajasthan Police Special Operations Group (एसओजी) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तपासानुसार, ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट (यूजी) परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे १ मे रोजी सीकरमध्ये एक हस्तलिखित ‘गेस पेपर’ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या गेस पेपरमध्ये सुमारे ३०० प्रश्न होते. त्यापैकी तब्बल १४० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
६०० गुणांचा थेट फायदा?
नीट परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण मिळतात. त्यामुळे १४० प्रश्न जुळल्यास विद्यार्थ्यांना सुमारे ५६० ते ६०० गुणांपर्यंत थेट फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे, केवळ प्रश्नच नव्हे तर पर्यायांचा क्रमही मूळ प्रश्नपत्रिकेसारखाच असल्याचे तपासात समोर आले आहे.
केरळ ते राजस्थान; तपासाची साखळी
एसओजीच्या तपासात या प्रकरणाचे धागेदोरे केरळमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आणि मूळ राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले आहेत. संबंधित विद्यार्थ्याने १ मे रोजी हा पेपर सीकरमधील एका मित्राला पाठवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यानंतर हा पेपर कोचिंग नेटवर्क, पीजी प्रशासक आणि करिअर समुपदेशकांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.
लाखोंमध्ये झाली कथित विक्री
प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला हा ‘गेस पेपर’ २० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत विकला जात होता. परीक्षेच्या आदल्या रात्री त्याची किंमत सुमारे ३० हजार रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संताप, चौकशी तीव्र
या प्रकरणामुळे देशभरातील नीट विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, राजस्थान एसओजीकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, डिजिटल पुरावे आणि मोबाईल चॅट्सची तपासणी सुरू आहे.
परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली. स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

Sep 29, 2026
MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या; २०२६ मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम

MPSC राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६च्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांनी नव्याने पेपर सेट करण्याची मागणी केली आहे.

Sep 17, 2026
MPSC विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; कर्ज, दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचा पोलिसांकडून तपास

MPSC विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; कर्ज, दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचा पोलिसांकडून तपास

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर अडीच लाखांचे कर्ज होते. दुष्काळ आणि पेपरफुटीच्या तणावाचाही संदर्भ समोर आला आहे.

Sep 09, 2026
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

Sep 01, 2026