जागतिक हवामान संघटना

'एल निनो'चा धोका आणखी तीव्र होणार? WMOचा गंभीर इशारा

El Niño Warning: घटनेचा प्रभाव फेब्रुवारी २०२७पर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, जगातील अनेक भागांत पाऊस, तापमान आणि वातावरणीय स्थितीत मोठे बदल होऊ शकतात. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ आणि तीव्र उष्णता

'एल निनो'चा धोका आणखी तीव्र होणार? WMOचा गंभीर इशारा

El Niño Warning

मुंबई (El Niño Warning) : प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान झपाट्याने वाढत असल्याने ‘एल निनो’ची स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. वर्षअखेरीस एल निनोचा प्रभाव अतिशय तीव्र पातळीवर पोहोचू शकतो, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. या घटनेचा प्रभाव फेब्रुवारी २०२७पर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, जगातील अनेक भागांत पाऊस, तापमान आणि वातावरणीय स्थितीत मोठे बदल होऊ शकतात. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा धोकाही वाढू शकतो.

निर्देशांक आणखी वाढला

मध्य-पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील विसंगती मोजणारा (El Niño Warning) ‘निनो ३.४’ निर्देशांक मे ते जुलै २०२६दरम्यान सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने अधिक होता. जुलैमध्ये तो सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने अधिक नोंदला गेला. जुलैअखेर ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत हा निर्देशांक आणखी वाढला असून, तो सरासरीपेक्षा २.६ अंश सेल्सिअसने अधिक होता. या वाढीवरून ‘एल निनो’ची तीव्रता लक्षात घेणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

थेट निष्कर्ष काढता येणार नाही

‘एल निनो’चा प्रभाव (El Niño Warning) सर्व देशांवर सारखा पडत नाही. त्याची तीव्रता, कालावधी, ऋतू; तसेच हिंदी महासागरासह इतर महासागरीय स्थिती यावर स्थानिक परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे अतिशय तीव्र ‘एल निनो’ म्हणजे भारतात हमखास दुष्काळ, असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र, भारतात ‘एल निनो’चे परिणाम यापूर्वीही सातत्याने अनुभवास आले आहेत.

अधिक सशक्त श्रेणीत जाण्याची शक्यता

‘एल निनो’च्या वाढत्या तीव्रतेमुळे ‘सुपर एल निनो’ (El Niño Warning) अशी चर्चा सुरू असली, तरी जागतिक हवामान संघटनेच्या प्रमाणित वर्गीकरणात ‘सुपर एल निनो’ ही संज्ञा वापरली जात नाही. सध्याच्या अंदाजानुसार विकसित होत असलेला ‘एल निनो’ अधिक सशक्त श्रेणीत जाण्याची शक्यता आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना आवाहन

जागतिक तापमानवाढ आधीच विक्रमी पातळीवर असताना या (El Niño Warning) ‘एल निनो’मुळे हवामानातील टोकाच्या घटनांचा धोका आणखी वाढू शकतो. त्यामुळे कृषी, जलसंपदा, आरोग्य, ऊर्जा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी पूर्वतयारी वाढवावी, असे आवाहन जागतिक हवामान संघटनेने केले आहे.

संबंधित सामग्री

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

ऊस उत्पादन घटल्याने, कमी स्टॉक आणि इथेनॉल निर्मितीमुळे साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीच्या फराळावर महागाईची झळ बसू शकते.

Oct 01, 2026
सुपर एल निनोचा कहर? भारतात 15,800 अतिरिक्त मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोचा कहर? भारतात 15,800 अतिरिक्त मृत्यूंची शक्यता

El Nino Effects: एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच आता सुपर एल निनोमुळे निर्माण..

Sep 29, 2026
सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोमुळे जगभरात ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज असून भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता. महाराष्ट्रातही १००% दुष्काळाचा इशारा.

Sep 24, 2026
इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

Indian Cyclone: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तीन तीव्र चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या अभ्यासातून समोर आले आहे. इस्रोच्या संशोधकांनी मागील सुमारे चार दशकांतील समुद्र..

Sep 16, 2026