तिबेटचे माजी पंतप्रधान लोबसांग सांगेय यांचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली (Chinese President Xi Jinping) : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत आणि चीनमधील अंतर्गत सत्तासंघर्षाबाबत खळबळजनक दावा समोर आला आहे. जिनपिंग यांना गेल्या काही काळात दोन ते तीन वेळा स्ट्रोक आल्याचा दावा तिबेटच्या निर्वासित सरकारचे माजी पंतप्रधान लोबसांग सांगेय यांनी केला आहे. मात्र, या दाव्याला स्वतंत्र अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. नवी दिल्लीत वृमुलाखतीत सांगेय (Lobsang sangey) यांनी चीनमधील सत्तासंघर्षाबाबतही अनेक दावे केले. (Chinese President Xi Jinping) जिनपिंग यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केल्यास चीनमध्ये लष्करी उठाव किंवा तख्तापलट होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांना वाटत असल्याचे सांगेय यांनी म्हटले.
‘चिनी अधिकाऱ्याने दिली माहिती’
सांगेय (Lobsang sangey) यांच्या म्हणण्यानुसार, ते दरवर्षी तैवानला जात असून तेथे विविध व्यक्तींशी चर्चा करतात. अशाच एका भेटीत एका वरिष्ठ माजी चिनी प्रशासकीय अधिकाऱ्याशी त्यांची दीर्घ चर्चा झाली. या अधिकाऱ्याने जिनपिंग (Chinese President Xi Jinping) यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिल्याचा दावा सांगेय यांनी केला. काही काळापूर्वी जिनपिंग तीन ते पाच आठवडे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले होते, असा उल्लेखही त्यांनी केला. याच काळात त्यांना स्ट्रोक आल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा सांगेय यांनी केला.
‘मेंटल फॉग’मुळे निर्णयांवर परिणाम?
सांगेय (Lobsang sangey) यांनी जिनपिंग (Chinese President Xi Jinping) यांच्या प्रकृतीबाबत आणखी काही दावे केले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर सूज दिसते, चालण्याच्या पद्धतीत बदल जाणवतो आणि त्यांच्यावर कामाचा मोठा ताण असल्याचे त्यांनी म्हटले. स्ट्रोक आणि प्रकृतीच्या समस्यांमुळे जिनपिंग यांच्यावर ‘मेंटल फॉग’चा परिणाम झाला असावा, असा दावा सांगेय यांनी केला. त्यातूनच चीनच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अचानक कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबाबतही दावा
जिनपिंग (Chinese President Xi Jinping) यांनी स्वतः नियुक्त केलेले अनेक वरिष्ठ जनरल आणि संरक्षण मंत्री अचानक पदावरून हटवले गेल्याचा किंवा सार्वजनिक जीवनातून गायब झाल्याचा दावा सांगेय यांनी केला. या घडामोडींमागे जिनपिंग यांच्या कथित मानसिक आणि आरोग्यविषयक समस्यांचा संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शी जिनपिंग यांच्या आरोग्याबाबत किंवा स्ट्रोकच्या दाव्याबाबत चीन सरकारकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे सांगेय (Lobsang sangey) यांनी केलेले हे दावे सध्या अपुष्ट असल्याचे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.