Political Controversy

'प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीचं राजकारण'; फडणवीसांची काँग्रेसवर टीका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

'प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीचं राजकारण'; फडणवीसांची काँग्रेसवर टीका

Political Controversy

सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया; प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीचे राजकारण केल्याचा आरोप

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून काँग्रेसवर सातत्याने टीका होत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडिया' असा उल्लेख केला, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसला जनतेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची भूमिका दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसवर अधिक टीका करत, "बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ" या भूमिकेतून पक्षाचे राजकारण सुरू असल्याचे म्हटले. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत इतक्या खालच्या स्तरावरील भाषा आणि टीका यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला असून, या मुद्द्यावर राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026