परभणी युवक खून

परभणीत खंडोबा कॉर्नर परिसरात राहत्या घरामध्ये युवकाचा खून

Parbhani youth murder: परभणी शहरातील खंडोबा बाजार कॉर्नर परिसरात शनिवार रात्र ३० मे नंतर एक युवक मृत अवस्थेत आढळला. त्याला धार-धार शस्त्राने वार केलेल्या जखमांची नोंद आहे.

परभणीत खंडोबा कॉर्नर परिसरात राहत्या घरामध्ये युवकाचा खून

Parbhani youth murder

 

नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना घटनास्थळावर पोलीस दाखल

परभणी (Parbhani youth murder) : शहरातील खंडोबा बाजार कॉर्नर परिसरात एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण मृत अवस्थेत आढळून आला. त्याचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना शनिवार ३० मे च्या मध्यरात्रीनंतर घडली. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, नानलपेठ ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. खून कोणी केला हे  अद्यापर्यंत उघड झालेला नाही.

परभणी शहरातील खंडोबा बाजार कॉर्नर परिसरात फिरोज खान अब्दुला खान (Parbhani youth murder) अंदाजे वय ३० वर्ष हा तरुण हा राहत्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर तो मृत झालेला आढळून  आला. त्याच्या मानेवर व पोटावर धार-धार शस्त्राने वार केलेल्या जखमा होत्या. घटनेची माहिती तात्काळ नानलपेठ पोलीसांना कळविण्यात आली.

सदरील घटना (Parbhani youth murder) ही नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली असून घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, शहर उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, नानलपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि मारोती कारावार, पोउपनी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास चालू केला. मयत इसम हा घरात मृत अवस्थेत पडलेला असल्यामुळे आरोपी जवळचाच असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविली जात आहे.  घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट चे पथक पाचारण करण्यात आले. खून नेमका कोणत्या कारणावरुन झाला, याचा अधिक तपास चालू असून एकही आरोपी अद्यापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलीसांनी दिली. 

नानलपेठ हद्दीत गुन्हेगारी वाढली
खंडोबा बाजार व परिसरात अमली पदार्थाची तस्करी करणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना आशिर्वाद हा नानलपेठ पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचा असल्याचे बोलले जात आहे. हा गुन्हा देखील अशाच कारणामुळे घडला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमलीपदार्थ विक्री व सेवन करणार्‍यांवर  अंकुश कधी बसणार ? असा प्रश्न परिसरातील नागरीकांना पडला आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026