वारंगा- हदगाव अपघात

दोन आयशर वाहनाच्या धडकेत दोनजण ठार

Waranga- Hadgaon accident: वारंगाफाटा-हदगाव रस्त्यावर ८ एप्रिल मध्यरात्री दोन आयशर वाहनाच्या धडकेत दोन व्यक्ती ठार झाले. या अपघातातील दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन नांदेड शासकीय रुग्णालयात केले गेले.

दोन आयशर वाहनाच्या धडकेत दोनजण ठार

Waranga- Hadgaon accident

वारंगा- हदगाव रस्त्यावर चुंचा गावाजवळ अपघात

आखाडा बाळापूर (Waranga- Hadgaon accident) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा- हदगाव रस्त्यावर चुंचा गावाजवळ ८ एप्रिल मध्यरात्रीनंतर १वाजण्याच्या सुमारास दोन आयशर वाहनांची धडक होउन या  झालेल्या भिषण अपघातात बिहार राज्यातील दोघेजण जागीच ठार झाले.नांदेड शासकीय रुग्णालयात  मृतदेहाचे शवविच्छेदन करून मयत शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा ते हदगाव  राष्ट्रीय महामार्गावर  चुंचा शिवारात  बीआर ०७ जीसी ३२५१ आणि एम एच २१ बी एच ५२७१ या दोन आयशर वाहनांची जोरात धडक झाली दोन्ही वाहने हदगाव कडून वारंगाफाटा कडे येत होती पाठीमागून धडक  एवढी भिषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला. या (Waranga- Hadgaon accident) अपघातात  खुर्शीद आलम अब्दुल गणी (वय३६ रा.नारी दरभंगा बिहार) अमजद अली मोहम्मद अली( २६) रा.नारी दरभंगा बिहार या भिषण अपघात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, वारंगाफाटा पोलीस मदत केंद्राचे शेख बाबरभाई, प्रभाकर भोंग व शिवाजी पवार ,पिराजी बेले,अमितकुमार जाधव पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली वाहनात फसलेल्या दोन्ही  मृतदेह बाहेर काढून अपघात ग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात प्रकरणी गुरुवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

मध्यरात्री नंतर एकमेकांवर धडकून हा झालेला अपघात एवढा भिषण होता दोघांचा वाहनातच दबून  मृत्यू  झाला दोन्ही मृतदेह काढण्यासाठी जेसीबी आणून बाहेर काढण्यात आले. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026