अल्पवयीन मुली विनयभंग

उदगिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Minor Girls Molestation: उदगिरात विकास नगर परिसरात एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. आरोपी आशिष प्रविण घोरपडे विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

उदगिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Minor Girls Molestation

आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

उदगीर (Minor Girls Molestation) : उदगीर शहरातील विकास नगर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये दि.६ एप्रिल रोजी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत अर्थात पोस्को अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च  रोजी सकाळी १०.३० ते ११  वाजण्याच्या सुमारास विकास नगर येथील एका बिल्डिंगमधील एका खोलीत ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असताना आरोपी आशिष प्रविण घोरपडे हा तेथे आला,यावेळी मैत्रीण बाहेर गेल्यानंतर मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. “मला तू आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे म्हणत आरोपीने (Minor Girls Molestation) जबरदस्तीने तिच्याजवळ येऊन तिच्या मनाला लज्जा निर्माण होइल आसे कृत्य करुन विनयभंग केला.  

या (Minor Girls Molestation) प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरोपीस दूर ढकलून तेथून पळ काढला.ही अल्पवयीन मुलगी घाबरलेली आसल्यामूळे तिने उशीरा हा घडलेला प्रकार घरी सांगीतला.हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर  या प्रकरणी पीडितेने दि.६ एप्रिल  रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हा पोलीस निरीक्षक दिलीप गाडे हे करत आहेत. पिडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द फोक्सो,माहिती तंञज्ञान अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

दरम्यान, (Minor Girls Molestation) अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

Udgir ST E-Card: ई-कार्ड मशीन बंद असल्याच्या कारणावरून उदगीर-अहमदपूर एसटी बसमध्ये प्रवासी आणि वाहकात झालेला वाद चांगलाच पेटल्याचा आरोप आहे. या वादात वाहकाने प्रवाशांना तसेच त्यांच्या आई-बहिणींविषयी

Oct 05, 2026
उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

Udgir's milk dairy: वर्षानुवर्षे बंद असलेल्या उदगीरच्या शासकीय दूध डेअरीच्या पुनरुज्जीवनाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे. उदगीर येथील शासकीय दूध डेअरीच्या अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल

Oct 05, 2026
अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

Udgir Illegal Money Lending: उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) मोठी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026