सेनगाव तरुण मृतदेह

खळबळजनक: सेनगाव तालुक्यातील उमरदरी शिवारात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Sengaon Youth Dead Body: सेनगाव तालुक्यातील उमरदरी शिवारात एका अज्ञात 25 वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला. त्याच्या हातावर 'Mom Love Dad' असा टॅटू आहे, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

खळबळजनक: सेनगाव तालुक्यातील उमरदरी शिवारात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Sengaon Youth Dead Body

हत्येचा संशय.मृताच्या हातावर 'Mom Love Dad', टॅटू
अनोळखी मृतदेहाचे ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सेनगाव (Sengaon Youth Dead Body) : तालुक्यातील उमरदरी पाटी शिवारात बुधवार ८ एप्रिल रोजी सकाळी एका २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर तरुणाचा घातपात करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरदरी पाटी परिसरातील निर्जन शिवारात एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती 8 एप्रिल ला बुधवारी सकाळी ग्रामस्थांना मिळाली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने या (Sengaon Youth Dead Body) घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना दिली. मृत तरुणाच्या अंगावर जखमांच्या खुणा असल्याने हा प्रकार खुनाचा असावा, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

ओळख पटवण्यासाठी पोलिसांसमोर आवाहन

मयत तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे असून, त्याच्या शरीरावर काही विशिष्ट खुणा आढळल्या आहेत. त्याने अंगावर पांढऱ्या रंगाचा 'Puma' कंपनीचा टी-शर्ट आणि निळसर रंगाची स्पोर्ट्स, नाईट पॅन्ट परिधान केलेली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या एका हातावर 'Sachita' व पावलाचे चिन्ह गोंदवलेले असून दुसऱ्या हातावर 'Mom Love Dad' असा टॅटू आहे. या वर्णनाचा कोणताही तरुण कोणाच्या माहितीत असल्यास किंवा बेपत्ता असल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व हवालदार जीवन मस्के यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तांत्रिक पुरावे व सूक्ष्म तपासणीसाठी हिंगोली येथून फॉरेन्सिक (न्यायवैद्यक शास्त्र) विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून काही महत्त्वाचे नमुने संकलित केले आहेत. तसेच श्वानपथक ही घटना स्थळी आले होते.

सदर तरुणाची हत्या नेमकी कोठे व कोणी केली?

मृतदेह (Sengaon Youth Dead Body) या ठिकाणी आणून टाकला की येथेच हा प्रकार घडला? या प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे. या घटनेमुळे उमरदरी परिसरात दहशतीचे सावट असून, सेनगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान अनोळखी मृतदेहाची ओळख कोणाला पटल्यास त्यांनी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले 7038833358 पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे 8459864152 यांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी भेट देऊन गुन्ह्या संदर्भात माहिती घेतली. सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याकरता हिंगोली जिल्ह्यासह लगत असलेल्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलांना माहिती देण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

Oct 07, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026