परभणीत अवैध वाळू

परभणीत अवैध वाळू उपसा करणारे तीन सक्षण इंजिन पंप जप्त; तीन तराफे जाळून केले नष्ट

Parbhani Illegal Sand: गंगाखेड पोलीस ठाण्यात अवैध वाळू उपसानेतील सक्षण इंजिन पंप जप्त करून, तीन तराफे जाळून नष्ट केले गेले. चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणीत अवैध वाळू उपसा करणारे तीन सक्षण इंजिन पंप जप्त; तीन तराफे जाळून केले नष्ट

Parbhani Illegal Sand

 

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धाडसी कारवाई....!

परभणी (Parbhani Illegal Sand) : गंगाखेड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवठाणा येथील गोदावरी नदी पात्रातून सक्षण इंजिन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार २५ मे रोजी कारवाई करत तीन सक्षण इंजिन पंप जप्त करून पोलीस ठाण्यात आणले तर तीन तराफे जाळून नष्ट केले आहे. एक तराफा तलाठी यांच्या ताब्यात दिला.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवठाणा येथील गोदावरी नदी पात्रातून सक्षण इंजिन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि श्रीधर जगताप, पोउपनि चंदनसिंह परिहार, पोह महेश कवठाळे, माणिकराव वाघ, राहुल परसोडे, सचिन भदरगे, सूर्यकांत फड, गजानन क्षिरसागर, पोशि दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत आदींनी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार २५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान देवठाणा गोदावरी नदी पात्रात छापा मारून कारवाई करून अंदाजे सहा लाख रुपये किंमतीचे तीन सक्षण पंप जप्त करून गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा केले तर एक तराफा देवठाणा येथील तलाठी यांच्या ताब्यात देत तीन तराफे जाळून नष्ट केले.

पोलीस आल्याची कुणकुण लागताच वाळू माफिया (Parbhani Illegal Sand) व मजूर पळून गेले. याप्रकरणी पोह माणिकराव वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात सचिन रमेश जोगदंड रा. देवठाणा, कृष्णा रामराव पवार रा. वझुर, भारत कोंडीबा गायकवाड, प्रकाश भाकरोबा कदम दोघे रा. खुर्लेवाडी या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईने वाळू माफियांचे धाबे दनाणले आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026