परभणी गांजा जप्त

परभणीत दोन महिलांकडून दिड लाखाचा गांजा जप्त...?

Parbhani ganja seized: परभणी जिल्ह्यातील अनुसया टॉकीज परिसरात कोतवाली पोलिसांनी दोन महिलांना सापळा रचून गंगाखेड रोडवर १.६५ लाख रुपयांचा ८.२५ किग्रा गांजा जप्त

परभणीत दोन महिलांकडून दिड लाखाचा गांजा जप्त...?

Parbhani ganja seized

 

शहरातील अनुसया टॉकीज परिसरात कोतवाली पोलिसांची कारवाई दोन महिला आरोपी ताब्यात

परभणी (Parbhani ganja seized) : शहरातील अनुसया टॉकीज परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना कोतवाली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ८ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री गंगाखेड रोडवरील अनुसया टॉकीज समोर ही कारवाई करण्यात आली. कोतवाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. जी. कासले यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई घनसावंत यांना दोन महिला गांजाची विक्री (Parbhani ganja seized) करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. पोलिसांनी अनुसया टॉकीज परिसरात सापळा रचून संशयित महिलांना अडवले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सीमा दस्तगीर शेख (वय ५०, रा. भीमनगर, परभणी) व रुपा माधव अंबाडे (वय ३६, रा. भीमनगर, परभणी) अशी सांगितली. सीमा शेख यांच्या हातातील लाल रंगाच्या प्रवासी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी चिकटपट्टीने पॅक केलेले चार मोठे पुडे आढळले.

पंच व राजपत्रित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत तपासणी केली असता या पुड्यांमध्ये हिरवट-काळसर रंगाचा गांजा असल्याचे निष्पन्न झाले. (Parbhani ganja seized) जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन ८ किलो २५० ग्रॅम असून त्याची किंमत १ लाख ६५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत विविध कलमानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत. सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी कासले, पो.नी मांजरमकर, सपोनी शिंगाडे, सपोउपनी साळवे, पोशी गौस, पोशी घनसावंत, पोशी चव्हाण, पोशी गुट्टे, पोह.रनखांब, मोपोशी टेहेरे, पोशी चव्हाण या कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्‍या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार दोन वर्ष सश्रम कारावास..

Sep 29, 2026