जिल्हा व सत्र न्यायालय गंगाखेड यांचा निकाल; सन २०२५ मधील प्रकरण
गंगाखेड (Parbhani Rigorous Imprisonment) : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार यांनी दोन वर्ष सश्रम कारावास आणि अडीच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी गजानन सर्जेराव सुर्यवंशी हा अल्पवयीन मुलगी शाळेत जात असतांना तीचा पाठलाग करायचा. सुरूवातीला मुलीने दुर्लक्ष केले. मात्र सतत पाठलाग होत असल्याने मुलीने पालकांना सांगीतले. याच दरम्यान मे २०२५ मध्ये पिडीता आपल्या आईसोबत जात असतांना आरोपीने तीचा पाठलाग करत तीच्या मनाला लज्जा वाटेल असे वक्तव्य केले. त्यानंतर १२ मे २०२५ रोजी पिडितेच्या भावाला फोन करून त्याला बोलावून घेत शिवीगाळ करत थापडबुक्यांनी मारहाण केली.
सदर प्रकरणात (Parbhani Rigorous Imprisonment) पिडितेच्या आईच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंद झाला. पोउपनि.एस.के.बोडके यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्पेâ पाच साक्षीदार तपासण्यात आले. पिडिता, तीची आई, भाऊ, तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी गजानन सुर्यवंशी याला दोन वर्ष सश्रम कारावास आणि अडीच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डी.यू.दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.एस.बी.पौळ यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड.एस.डी. वाकोडकर यांनी सहकार्य केले. कोर्टपैरवी म्हणून पोलिस अंमलदार स्नेहल जिंकलवाड, एल.व्ही.मुंढे, मारोती कुंडगिर, पठाण, शिवराज फड, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.