परभणी पिस्तूल दहशत

परभणीत खरी पिस्तूल असल्याचा बनाव करून दहशत माजवणारा इसम केले जेरबंद

Parbhani Pistol Terror: परभणी येथे सोनपेठ जिल्ह्यातील महातपुरी फाट्यावर, एका व्यक्तीने बनावट पिस्तूल बनवून सोशल मीडिया व ग्रुपवर शस्त्रासंबंधी फोटो प्रसारित

परभणीत खरी पिस्तूल असल्याचा बनाव करून दहशत माजवणारा इसम केले जेरबंद

Parbhani Pistol Terror

 

स्थानिक गुन्हे शाखेची महातपुरी फाटा येथे कारवाई; पिस्तूलसदृश्य लाइटर गन व छऱ्या गन जप्त

परभणी/सोनपेठ (Parbhani Pistol Terror) : सोनपेठ येथे गावात व परिसरात खरी पिस्तूल असल्याचा बनाव करून सोशल मीडियावर फोटो प्रसारित करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई दि १२ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महातपुरी फाटा येथे करण्यात आली. या प्रकरणी सोनपेठ पोलीस स्थानकात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या मौजे महातपुरी येथे एकास खरी पिस्तूल (Parbhani Pistol Terror) असल्याचे सांगुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.हि कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्रांबाबत माहिती संकलन व गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विशाल नारायण डुमणे (रा. महातपुरी) हा अग्निशस्त्रासारखी दिसणारी पिस्तूल कमरेला लावून फिरत असून ती खरी असल्याचे सांगत आहे. तसेच तो पिस्तूलासह फोटो काढून व्हॉट्सअॅप स्टेटस, डीपी व विविध ग्रुपवर प्रसारित करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे समजले.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष महातपुरी फाटा येथील पांडुरंग हॉटेल परिसरात सापळा रचून विशाल डुमणे यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लाकडी ग्रीप असलेली लोखंडी पिस्तूलसदृश्य छऱ्या गन व एक लोखंडी पिस्तूलसारखी दिसणारी लाइटर गन असा मुद्देमाल मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या या दोन्ही वस्तूंची किंमत अनुक्रमे दोन हजार रुपये व एक हजार रुपये असून एकूण तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या (Parbhani Pistol Terror) वस्तूंबाबत कागदपत्रांची मागणी केली असता आरोपीकडे कोणतेही परवाने अथवा कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. सदर आरोपी हा बनावट शस्त्रांचा वापर करून स्वतःची दहशत निर्माण करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंदन परिहार, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, पोलीस शिपाई शरद सावंत, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, गजानन शिरसागर, चालक हनवते तसेच सायबर सेलचे गणेश कोटकर यांनी केली.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्‍या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार दोन वर्ष सश्रम कारावास..

Sep 29, 2026