नागपुर खळबळजनक घटना

हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू

Nagpur Child Death: नागपुरातील गिट्टी खदान हद्दीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेदरम्यान बेपत्ता झालेल्या अथर्व नानोरे याचा मृतदेह भरतवाडा परिसरात आढळला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम चौकशीत व्यस्त आहेत.

हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू

Nagpur Child Death

नागपूर (Nagpur Child Death) : हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या वातावरणात नागपुरात एक खळबळजनक घटना घडली आहे. गिट्टी खदान हद्दीतून शोभायात्रेदरम्यान बेपत्ता झालेल्या अथर्व नानोरे वय १४ वर्षे  या बालकाचा मृतदेह आज भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झाला होता, तिथूनच तो (Nagpur Child Death) बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

अखेर आज भरतवाडा परिसरात एका बोरीमध्ये  त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला.अथर्वची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे. (Nagpur Child Death) अथर्वचे हात बांधलेले अवस्थेत होते. त्याच्या गळ्याला देखील आवळले होते. त्याची जीभ बाहेर आलेली असल्याने, त्याचा गळा दाबून किंवा आवळून खून करण्यात आला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

एका निष्पाप मुलाची इतक्या टोकाच्या निर्दयतेने हत्या कोणी आणि का केली असावी? या प्रश्नाने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या (Nagpur Child Death) घटनेमुळे नानोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान आजच अथर्व मिळावा, यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026
कुरखेड्यात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन; स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा एल्गार

कुरखेड्यात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन; स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा एल्गार

Nagpur Karar Holi Andolan: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरखेडा परिसरात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच नागपूर करार

Sep 28, 2026