राष्ट्रीय महामार्ग अपघात

राष्ट्रीय महामार्ग ६१ वर भरधाव  ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार  

National Highway Accidents: मंगळवारी परभणीतील मानवत-पाथरी राष्ट्रीय महामार्ग ६१वर एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वारीला धडक दिली

राष्ट्रीय महामार्ग ६१ वर भरधाव  ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार  

National Highway Accidents

परभणीच्या मानवत तालुक्यातील रुढी पाटीजवळील जिनिंग जवळ घडली घटना
मालवाहू ट्रक चालक वाहनासह पसार....!

परभणी/ मानवत () : परभणीतील मानवत-पाथरी राष्ट्रीय महामार्ग ६१ मार्गावरील रुढी पाटीजवळ मंगळवारी सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान एका भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या (National Highway Accidents) अपघातील ट्रक चालक मात्र आपल्या वाहनासह प्रसार झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाथरी येथील मृत दुचाकीस्वाराचे नाव स्वप्निल लक्ष्मीकांत मानवतकर (वय ४८ ) असे असून ते पाथरी येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. लक्ष्मीकांत मानवतकर यांचे चिरंजीव आहेत स्वप्निल मानवतकर हे आपल्या एम.एच.२२ बी १६६२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून परभणी हून पाथरीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील रूढी पाटीजवळी एका जिनिंग जवळ भरधाव वेगातील मानवत हून परभणी जाणाऱ्या एम.एच.१२ एन.एक्स.१७८९ या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात (National Highway Accidents) इतका भीषण होता की, स्वप्निल मानवतकर यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर संबंधित मालवाहू ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी ट्रकचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रक भरधाव वेगाने निघून गेला असल्याचे सांगितले घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ स्वप्निल मानवतकर यांना उपचारासाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.असून  फरार ट्रक चालकाचा  शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मानवत पोलीस कडून मिळत आहे

संबंधित सामग्री

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

Gondia Accident गोंदिया जिल्ह्यातील नागरा परिसरात भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअपमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर

Sep 08, 2026
रक्षाबंधनाच्या दिवशी भोर कुटुंबावर काळाचा घाला; ट्रकखाली चिरडून बाप-लेकिचा मृत्यू, आई गंभीर

रक्षाबंधनाच्या दिवशी भोर कुटुंबावर काळाचा घाला; ट्रकखाली चिरडून बाप-लेकिचा मृत्यू, आई गंभीर

रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी निघालेल्या भोर कुटुंबाचा प्रवास चाकणजवळील वासुली येथे दुर्दैवी ठरला.

Aug 29, 2026
विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Accidental death: नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर कारमधील दोन प्रवासी..

Aug 25, 2026
तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Aug 24, 2026