अपघाती मृत्यू

विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Accidental death: नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर कारमधील दोन प्रवासी..

विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Accidental death

डोंगरकडा (Accidental death) : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात हा अपघात झाला.

या (Accidental death) अपघातात संदीप हिरामण पवार वय ३० राहणार झुंनझूनवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार,नांदेडकडून वारंगाकडे जाणार्‍या अज्ञात ट्रकने पुढे जात असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.धडकेमुळे कार अनियंत्रित होऊन समोरून जात असलेल्या दुचाकीवर आदळली.कारची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संदीप पवार यांचा जागीच मृत्यू झाला.

कारमधील दोन प्रवासी रा.सोनखेड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाता नंतर अज्ञात ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. (Accidental death) घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील १०३३ आणि १०८  क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 

कुटूंबाचा आधार हरपला
संदीप पवार हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित सामग्री

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्‍यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.

Oct 06, 2026
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026