लातूर पोलिस मोहीम

लातूर पोलिसांचे ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन'!

Latur Police Mission: लातूर पोलिसांनी २४ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून ६ जणांवर शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई,

लातूर पोलिसांचे ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन'!

Latur Police Mission

६ जणांवर शस्त्र अधि. कायद्यान्वये कारवाई, ११ जणांवर प्रतिबंधात्मक गुन्हे, 127 सराईत गुन्हेगारांची तपासणी

लातूर (Latur Police Mission) : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाच्या वतीने दि. २४ ते २५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री अचानकपणे जिल्हाभरात ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान ६ जणांवर शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. तर गुन्हे करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या वावरणाऱ्या ११ गुन्हे दाखल करण्यात आले.

ऑपरेशनअंतर्गत 127 रेकॉर्डवरील घरफोडी व (Latur Police Mission) इतर गुन्ह्यांतील सराईत आरोपींच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या हालचालींची माहिती घेण्यात आली. तसेच त्यांना भविष्यात कोणतेही समाजविघातक कृत्य न करण्याबाबत समज देण्यात आली. ११० लॉजेस व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून ३० संवेदनशील (मर्मस्थळ) ठिकाणांना भेटी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विविध ३१ ठिकाणी नाकाबंदी करून ८२७ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमुळे संशयित हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 22 वाहनचालका विरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.

31 अधिकारी 106 पोलीस आणि 88 होमगार्ड सहभागी 

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. (Latur Police Mission) सदर मोहिमेत लातूर जिल्हा पोलीस दलातील एकूण 31 पोलीस अधिकारी ,106 पोलीस अंमलदार आणि 88 होमगार्ड हे सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026