मुलीवर सामुहीक अत्याचार

बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

Girl Gang-rape: वसमत तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या वेडसर पणाचा फायदा घेऊन तिला बिस्किट व पन्नास रुपये देतो असे म्हणुन मोटार सायकलवर बसवून नेऊन तिच्यावर सामुहीक अत्याचार

बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

Girl Gang-rape

 

चारही आरोपींना अटक; २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

हट्टा (Girl Gang-rape) : वसमत तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या वेडसर पणाचा फायदा घेऊन तिला बिस्किट व पन्नास रुपये देतो असे म्हणुन मोटार सायकलवर बसवून नेऊन तिच्यावर सामुहीक अत्याचार केल्याने चार नराधमांवर पोक्सोसह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.  गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील एका गावामधील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कुटूंब  बाहेरगावी गेल्याची संधी साधून १३ ऑगस्टला तसेच १५ दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीस बिस्कीट व पन्नास रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला काही जणांनी मोटार सायकलवर बसवून नेऊन एका ऊसाच्या शेतात नेल्यावर तिच्यावर सामुहीक अत्याचार करण्यात आला. या प्रकरामुळे अल्पवयीन मुलगी चांगलीच गांगारून गेली होती. या मुलीचे कुटूंबीय बाहेर गावावरून आल्यानंतर ती वेगळ्या पध्दतीने वागत असल्याने कुटूंबियांनी तिला रूग्णालयात नेले.

याच दरम्यान तिच्या अंगावरील कपडे चिखलाने भरलेले दिसून आल्याने घरच्यांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेल्या (Girl Gang-rape) घटनेची माहिती दिली. तिघांनी बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याचे सांगितल्याने १९ ऑगस्टला मुलीसह कुटूंबियांनी हट्टा पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. यानुसार विजय खाडे, लखन खाडे, प्रविण खाडे, प्रकाश खाडे या चार नराधमांवर पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हट्टा पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तपासचक्र फिरवले असता लखन खाडे, प्रविण खाडे, प्रकाश खाडे या तिघांना ताब्यात घेण्यात आले.  

तर चौथा फरार असलेला विजय खाडे याला २० ऑगस्ट गुरूवार रोजी जवळा बाजार येथून ताब्यात घेण्यात आले. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ ऑगस्ट पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बोरकर यांनी दिली. विशेष म्हणजे चार आरोपी पैकी तिघेजण विवाहित असल्याची माहिती सुध्दा पोलिसांना प्राप्त झाली आहे.

संबंधित सामग्री

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..

Aug 30, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

Minor Girls Atrocities: एक जिल्ह्यातील गावात ११ ऑगस्टला एका अल्पवयीन मुलीवर लिंगप्रति अत्याचार केल्याने गर्भवती करण्याच्या घटनेची खळबळ घडली.

Aug 12, 2026
छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

​​​​​​​छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.

Aug 05, 2026
शिकवणीला गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

शिकवणीला गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

Girls Atrocities Case: १४ वर्षाचे मुलीचे नेटीकरण आणि अत्याचार, पोलिसाने १८ जुलै रोजी आरोपी मारुत सोहम ऐंगडेवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. घटना बरबडी येथे झाली.

Jul 19, 2026
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता शाळा-कोलेजमध्ये शिकवले जाणार 'लैंगिक शिक्षण'

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता शाळा-कोलेजमध्ये शिकवले जाणार 'लैंगिक शिक्षण'

School Sex Education: केंद्र सरकार लवकरच देशातील शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण समाविष्ट करण्याच्या तयारीत, न्यायालयाच्या मंजुरीनंतर या उपक्रमाची अंमलबजावणी

Jul 15, 2026