घोट (Minor Girls Atrocities) : घोट परिसरातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी उडकीस आली. पीडितेला अचानक पोटात दुखत असल्याने पीडीतीच्या आजीने तिला गडचिरोली येथील जिल्हा महिला बाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे सांगितले त्यावरून पीडीतेला विश्वासात घेऊन चौकशी केले असता आरोपी प्रविण अतुल झगडकर वय २५ वर्ष याने एप्रील महिन्यापासून पीडीतेवर अत्याचार करत असल्याचे सांगितले.
त्यावरून घोट पोलीस मदत केंद्रात आरोपी विसद्ध कलम ६४ ( २ ) ( आय ) , ६४ ( २ ) ( एम ) बी एम एस सह कलम ४ , ६ अनुसार पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (Minor Girls Atrocities) आरोपी याला गडचिरोली न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर घटनेचा तपास घोट पोलीस मदत केंद्रात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश खारोडे करीत आहेत.