Child Sexual Abuse Material

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

​​​​​​​छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

Child Sexual Abuse Material

UPI व्यवहारांमधून देशभरातील ग्राहकांचा मागोवा; ३,०४१ व्हिडिओ डिलीट केल्याचा प्रयत्न, फॉरेन्सिक तपास सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणात बी.कॉम द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे पार्थ सुनील कुलकर्णी आणि शुभम राजेंद्र लोहाडे या दोघांना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान डार्कनेटशी संबंधित मोठ्या साखळीचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

तपासानुसार, आरोपी टेलिग्रामवरील चॅटिंग, डेटिंग आणि पॉर्न ग्रुप्सचा वापर करून ही सामग्री ग्राहकांपर्यंत पोहोचवत होते. बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ १०० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जात होते, तर अश्लील छायाचित्रांसाठी अवघे ५ रुपये आकारले जात होते. पार्थ टेलिग्रामवरील खाती हाताळून ग्राहकांना साहित्य पाठवत होता, तर शुभम यूपीआयद्वारे स्वतःच्या बँक खात्यात पैसे स्वीकारत होता.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना १ ऑगस्ट रोजी या प्रकाराची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर संशयितांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली. त्यानंतर २ आणि ३ ऑगस्ट रोजी पार्थ आणि शुभम स्वतः पोलिसांसमोर हजर झाले.

पोलिसांनी दोघांचे मोबाईल आणि टॅबची तपासणी केली असता, पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी क्लाउड स्टोरेजमधील मोठ्या प्रमाणातील डेटा हटविल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणात त्यांच्या क्लाउड खात्यांमध्ये तब्बल ३,०४१ अश्लील व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलिसांनी २०० व्हिडिओ जप्त केले असून, हटविण्यात आलेला डेटा फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने पुन्हा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, शुभमच्या बँक खात्यातील यूपीआय व्यवहारांची चौकशी करताना २०२३ पासून गुजरात, पंजाब, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथील ग्राहकांकडून पैसे आल्याचे स्पष्ट झाले. या खात्यावर दरमहा ६० ते ७० व्यवहार होत असून, त्यातून २० ते २५ हजार रुपये जमा होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. शुभमच्या खात्याव्यतिरिक्त आणखी एका साथीदाराच्या खात्यावरही पैसे स्वीकारले जात असल्याचे पोलिसांना आढळले आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, पार्थ आणि शुभम हे या साखळीतील केवळ वितरक असल्याचा संशय आहे. मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ पुरवठा करणारा मुख्य स्रोत परराज्यातील एका डार्कनेट सिंडिकेटशी संबंधित असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षांतील हजारो डिजिटल व्यवहारांचा तपास सुरू असून, या माध्यमातून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026