हिंगोली (Hingoli Bribery Case) : उपाधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील २ भुकरमापकांनी लाचेची मागणी करून ४ हजार रुपये लाच स्विकारल्याने हिंगोली शहर पोलिसात दोघावर गुन्हा दाखल झाला होता. या दोघांना प्रारंभी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. (Hingoli Bribery Case) मुदत संपल्याने वसमत विशेष न्यायालयात २५ मे रोजी हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची परभणी कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक विकास घनवट यांनी दिली.
हिंगोली भूमिअभिलेख कार्यालयातील (Hingoli Bribery Case) उमेश मधुकर राऊत व अविनाश नंदकिशोर गोरे या दोघांना वसमत विशेष न्यायालयाचे न्यायाधिश बांगडे यांनी ९ जूनपर्यंत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान त्यांच्या जामीनसाठी दाखल केलेल्या अर्जावर २८ मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हिंगोलीतील दोन लाचखोर भुकरमापकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
Hingoli Bribery Case: हिंगोली पोलिसाने दोन भुकरमापकांवर लाचखोरपण्याचा गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयीन कोठडी १४ दिवसाची मिळाली. जामीनासाठी सुनावणी २८ मे रोजी होणार आहे.
Hingoli Bribery Case
संबंधित सामग्री
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..
Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय
FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप
FCRA नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याच्या आरोपावरून गृह मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना दिल्लीत रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त
कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.
लाच प्रकरणात कान्हेगावच्या तलाठी महिलेचे निलंबन
Kanhegaon Talathi Bribery Case: कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील तलाठी महिलेने एका व्यक्तीकडून ५०० रुपयाची लाच स्विकारली होती. या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.