हिंगोली (Corrupt Asst Agriculture Officer) : औंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव शिवारामधील केळी पिकाचे अनुदान मिळण्यासाठी सहा मस्टरवर स्वाक्षरी करून ते तालुका कृषि अधिकार्याकडे पाठविण्याकरीता जलालपूर येथील सहाय्यक कृषि अधिकारी मोहन भगवानराव माने यांनी पाच हजाराची लाच स्विकारली होती. यामध्ये औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यात विभागीय कृषि सहसंचालक महेशकुमार तिर्थकर यांनी मोहन माने यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
औैंढा नागनाथ तालुक्यातील दौडगाव येथील एका व्यक्तीच्या वडीलोपार्जीत शेत जमिन गट क्र.२११ मध्ये केळीची लागवड करण्यात आली होती. केळी पिकाचे अनुदान मिळविण्यासाठी सहा मस्टरवर स्वाक्षरी करून ते तालुका कृषि अधिकार्यांकडे पाठविण्यासाठी प्रत्येकी मस्टरचे १ हजार रुपये प्रमाणे अशा ६ मस्टरच्या कामासाठी ६ हजार रुपयाची मागणी केल्यानंतर तडजोडीत पाच हजाराची रक्कम स्विकारतांना १८ जुन रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील जलालपूर येथील (Corrupt Asst Agriculture Officer) सहाय्यक कृषि अधिकारी मोहन भगवानराव माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, भगवान मंडलिक, गजानन पवार, शिवाजी वाघ, विनोद पुंडगे यांच्या पथकाने हिंगोली परभणी जाणार्या रस्त्यावर औढा नागनाथ येथील ग्रॅज्युएट गुळाच्या चहा टपरी समोर रंगेहात पकडले होते.
या (Corrupt Asst Agriculture Officer) प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये सहाय्यक कृषि अधिकारी मोहन माने यांना १९ जूनला अटक करून न्यायालयात हजर केले असता २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या बाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय कृषि सहसंचालक लातूर यांच्याकडे पाठविला होता. त्यावरून लातूर विभागाचे विभागीय सहसंचालक महेशकुमार तिर्थकर यांनी मोहन भगवानराव माने यांच्या निलंबनाचे आदेश काढले. १९ जून पासुन त्यांना निलंबित करण्यात आले असुन या कालावधीत त्यांचे मुख्यालय उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड येथे देण्यात आले. या दरम्यान पुर्व परवानगी शिवाय त्यांना निलंबन कालावधीमध्ये नेमुण देण्यात आलेले मुख्यालय सोडता येणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
लाचखोर सहाय्यक कृषि अधिकारी निलंबित
Corrupt Asst Agriculture Officer: जलालपूर येथील सहाय्यक कृषि अधिकारी मोहन भगवानराव माने यांनी पाच हजाराची लाच स्विकारली होती. यामध्ये औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल
Corrupt Asst Agriculture Officer
संबंधित सामग्री
आसोला (खुर्द) फाटा ते चाकुर पांदण रस्ता विकासासाठी निधी देण्याची मागणी
Asola-Chakur Pandan road: मानोरा तालुक्यातील आसोला (फाटा) ते चाकुर पांदन रस्त्यासह गावातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन खासदार संजय देशमुख यांना
गोरेगाव व संतुक पिंपरी येथे झन्ना मन्ना जुगारावर छापे
Hingoli Gambling Raids: जिल्ह्यातील गोरेगाव व संतुक पिंपरी येथे सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा व गोरेगाव पोलिसांनी छापे मारून गुन्हे दाखल केले.
जमिनीच्या मोजणीसाठी ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात
Land survey bribe: शेतजमिनीची मोजणी व पडताळणी करून देण्यासाठी ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दोन लाचखोर लिपिक जाळ्यात
Parbhani Clerk Bribe: दोन लाचखोर लिपिकांनी दुचाकीच्या नावावर करण्यासाठी लाच मागितली. परभणी लाच लढाऊ पंचतंत्राने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काजल व मोबाईल जपत केले.
पाच हजारांची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समिती कंत्राटी अभियंता चतुर्भुज
Contract Engineer Chaturbhuj: लाभार्थ्यातील पाच हजार रु. मागण्यासाठी कंत्राटी अभियंत्याने लाच मागितल्याचा आरोप, तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचला आणि अटक करण्यात आली.