आसोला-चाकुर पांदण रस्ता

आसोला (खुर्द) फाटा ते चाकुर पांदण रस्ता विकासासाठी निधी देण्याची मागणी

Asola-Chakur Pandan road: मानोरा तालुक्यातील आसोला (फाटा) ते चाकुर पांदन रस्त्यासह गावातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन खासदार संजय देशमुख यांना

आसोला (खुर्द) फाटा ते चाकुर पांदण रस्ता विकासासाठी निधी देण्याची मागणी

Asola-Chakur Pandan road

 

खासदार संजय देशमुख यांना निवेदन

मानोरा (Asola-Chakur Pandan road) : मानोरा तालुक्यातील आसोला (फाटा) ते चाकुर पांदन रस्त्यासह गावातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन दि. १४ सप्टेंबर रोजी ग्राम पंचायतमार्फत खासदार संजय देशमुख यांना त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ता वसंतराव राठोड व उपसरपंच बादल राठोड यांनी दिले आहे. 

दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, आसोला खुर्द फाटा ते चाकुर पांदन रस्त्याची (Asola-Chakur Pandan road) दयनीय अवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना अंदाजे २ किलोमीटर रस्त्यावरून शेतात जाण्या - येण्यासाठी अतोनात त्रास सहन करून घेण्याची पाळी आलेली आहे.  त्यासोबतच तीर्थक्षेत्र सोहमनाथ मंदीर संस्थानला ब वर्गाचा दर्जा शासनाकडून प्राप्त झाल्यामुळे मंदिराचा व गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्याकरिता शासनाकडून भरीव निधीची तरतूद करून देण्यात यावी, असे निवेदन दिले आहे.  

निवेदनावर सरपंच निकिता वसंतराव राठोड यांचीही स्वाक्षरी असून, गावातील या मागण्यांकडे खासदारांनी लक्ष देऊन लवकरात लवकर शासनाकडून निधी मंजूर  करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टैग्स: AsolaChakur Pandan road