कंत्राटी अभियंता चतुर्भुज

पाच हजारांची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समिती कंत्राटी अभियंता चतुर्भुज

Contract Engineer Chaturbhuj: लाभार्थ्यातील पाच हजार रु. मागण्यासाठी कंत्राटी अभियंत्याने लाच मागितल्याचा आरोप, तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचला आणि अटक करण्यात आली.

पाच हजारांची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समिती कंत्राटी अभियंता चतुर्भुज

Contract Engineer Chaturbhuj

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी; स्थगिती कारवाईद्वारे गुन्हा दाखल

वसमत (Contract Engineer Chaturbhuj) : लाभार्थ्याला पाच हजार रुपयाची लाच मागितली तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती तक्रारीचे पडताळणी झाली मात्र लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे तो सापळ्यातून निसटला म्हणून निर्धास्त होता परंतु लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने सदर लाचखोर कंत्राटी अभियंता विरोधात सापळा स्थगिती कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात आला व त्यास बुधवारी करण्यात आली या कारवाईने वसमत पंचायत समितीमध्ये लाभार्थ्याची लुबाडणूक कोण्या पद्धतीने होते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

वसमत तालुक्यातील किन्होळा येथे गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन दुसरा व तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्या विरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वसमत तालुक्यातील किनोळा येथील  तक्रारदाराने १० जून २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या गायगोठा योजनेअंतर्गत मंजूर अनुदानाचा उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी मोजमाप पुस्तिका  लिहून त्यावर स्वाक्षरी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारीची शहानिशा पडताळणी केली. या पडताळणीत आरोपी गणेश गुजर यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर २२ जून २०२६ रोजी लाच स्वीकारताना  पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. मात्र, आरोपीला काहीतरी संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्या दिवशी सापळा स्थगित करण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने भेटणे टाळले तसेच फोनही स्वीकारले नसल्याचे तपासात समोर आले. या संदर्भात अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा स्थगिती कारवाई केली आणि वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असूनआरोपीला ताब्यात घेण्यात आलेआहे . ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोलीचे पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांनी पर्यवेक्षण केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड करीत आहेत.

आरोपीच्या घराची झडती
वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंता त्याच्यावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा नोंदवल्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीची अंगद हळदी घेण्यात आली त्याच्याकडून मोबाईल व रोख 5171 रुपये सापडले आहेतआरोपीच्या परभणी येथील घराची झडती घेण्याचे काम सुरू असल्याचेही वृत्त आहे. 

पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांची लूट 
वसमत पंचायत समितीमध्ये विविध विभागात लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी किंवा लाभ देण्यासाठी पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत कंत्राटी  अभियंते यात आघाडीवर असल्याचेही समोर येत आहे विविध विभागात पैसे दिले शिवाय काम होत नसल्याचे ही तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर लाच रुचकर प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई या तक्रारींना पुष्टी देत आहे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्य लक्ष देऊन सर्वसामान्य शेतकरी व लाभार्थ्यांची लूट होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधित सामग्री

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.

Sep 26, 2026
आसोला (खुर्द) फाटा ते चाकुर पांदण रस्ता विकासासाठी निधी देण्याची मागणी

आसोला (खुर्द) फाटा ते चाकुर पांदण रस्ता विकासासाठी निधी देण्याची मागणी

Asola-Chakur Pandan road: मानोरा तालुक्यातील आसोला (फाटा) ते चाकुर पांदन रस्त्यासह गावातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन खासदार संजय देशमुख यांना

Sep 14, 2026
परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026
जमिनीच्या मोजणीसाठी ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

जमिनीच्या मोजणीसाठी ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

Land survey bribe: शेतजमिनीची मोजणी व पडताळणी करून देण्यासाठी ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Jul 29, 2026