नायब तहसीलदार हल्ला

नायब तहसीलदारास ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

Deputy Tehsildar attack: गडचिरोलीमध्ये रेती तस्करांनी नायब तहसीलदारास ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. तक्रार दाखल होण्यास ११ दिवसांचा विलंब झाला.

नायब तहसीलदारास ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

Deputy Tehsildar attack

रेती तस्करांचा धक्कादायक प्रकार: तक्रार दाखल करण्यास विलंब

गडचिरोली (Deputy Tehsildar attack) : जिल्ह्यात अवैध गौण खनिज तस्करी करणार्‍यांची मुजोरी वाढत चालली असून महसूल अधिकार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गडचिरोली तालुक्यातील साखरा फाटा येथे ५ एप्रिल रोजी (Deputy Tehsildar attack) नायब तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या घटनेनंतरही तक्रार दाखल करण्यास तब्बल ११ दिवसांचा विलंब झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने साखरा फाटा येथे अवैध गिट्टी वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एमएच ३३ यू ५३८२ अडवला. या कारवाईत मंडळाधिकारी ए. ए. गव्हाणे व (Deputy Tehsildar attack) नायब तहसीलदार डी. ए. ठाकरे सहभागी होते. तपासणीदरम्यान चालक मंगेश तोडासे रा. येरगाव, ता. मूल याच्याकडे असलेला परवाना मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. तसेच, चार ब्रास परवानगी असताना ट्रकमध्ये त्यापेक्षा अधिक गिट्टी भरलेली असल्याचे स्पष्ट झाले.

कारवाईदरम्यान चालकाने ट्रक मालक होमेश चिलबुले रा. गडचिरोली  याला घटनास्थळी बोलावले. त्यानंतर मालकाने अधिकार्‍यांशी वाद घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व कारवाईला विरोध दर्शविला. याचदरम्यान चालकाने मालकाच्या चिथावणीवरून नायब तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. गोंधळाच्या परिस्थितीत ट्रक मालक दुचाकीवरून पसार झाला.

घटना ५ एप्रिल रोजी घडूनही या प्रकरणी पोलीस तक्रार १६ एप्रिल रोजी दाखल करण्यात आली. तक्रार दाखल करण्यात झालेल्या या ११ दिवसांच्या विलंबामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, (Deputy Tehsildar attack) घटनेच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या मंडळाधिकारी रुपेश गोरेवार यांनी तक्रार नोंदविल्याची बाबही चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, नायब तहसीलदारांना चिरडण्याचा प्रयत्न करणारा चालक अद्याप मोकाट असल्याची माहिती समोर येत असून केवळ ट्रक मालकावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते. या संदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद चव्हाण यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीविरुद्ध १७ एप्रिल रोजी ‘सरकारी कामात अडथळा’ आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रार उशिरा प्राप्त झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.

या (Deputy Tehsildar attack) प्रकरणात केवळ ‘सरकारी कामात अडथळा’ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नायब तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याने संबंधितांवर ‘जीव घेण्याचा प्रयत्न’ या गंभीर गुन्ह्याखाली कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, ट्रक मालकाकडून झालेल्या शिवीगाळ व धमक्यांची सखोल चौकशी व्âरण्याचीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालून महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026
होर्मुझमध्ये जहाजावर हल्ला; 11 भारतीय कर्मचारी जखमी

होर्मुझमध्ये जहाजावर हल्ला; 11 भारतीय कर्मचारी जखमी

Hormuz ship attack: ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असलेल्या पनामा-ध्वजांकित व्यावसायिक जहाजावर मंगळवारी प्रोजेक्टाइलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 12 कर्मचारी जखमी

Oct 06, 2026
“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

फ्लायदुबई FZ1073 संकटातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे सलमान खानने कौतुक केले. मोदींसोबतच्या संवादात मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला.

Oct 03, 2026
धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026