Chandrapur Crime

चंद्रपूर येथे मटणावरून वाद अन् रक्तरंजित अंत! चिमूरमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची कुऱ्हाडीने हत्या

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून झालेल्या वादाचा भयंकर शेवट झाला.

चंद्रपूर येथे मटणावरून वाद अन् रक्तरंजित अंत! चिमूरमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची कुऱ्हाडीने हत्या

Chandrapur Crime

शंकरपूर येथील धक्कादायक घटना; रमेश बनकर यांचा जागीच मृत्यू, आरोपी मोठा भाऊ जगन बनकर पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून झालेल्या वादाचा भयंकर शेवट झाला. सख्ख्या भावांमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादातून मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात रमेश श्रीराम बनकर (वय ५५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी भिसी पोलिसांनी आरोपी जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघे भाऊ एकत्र राहत होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची बहीण घरी आली होती. तिच्या स्वागतासाठी घरात मटणाचा बेत करण्यात आला होता. बहीण राखी बांधून घरी परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणावरून जगन आणि रमेश यांच्यात वादाला सुरुवात झाली.

दोघेही दारूच्या नशेत असल्याने सुरुवातीचा शाब्दिक वाद काही वेळातच वाढत गेला. त्यानंतर संतापलेल्या जगनने घरातील कुऱ्हाड हातात घेत रमेश यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुऱ्हाडीचे वार गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.

दरम्यान, भिसी पोलीस आणि शंकरपूर चौकीच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपी जगन बनकर याला अटक केली. मटणासारख्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने शंकरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करत असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026