इको बँक एटीएम चोरी

परभणीतील इको बँक एटीएम चोरीप्रकरण; चोरटा स्थागुशाच्या ताब्यात 

Eco Bank ATM Theft: परभणीत इको बँक एटिम चोराचा १८ जुलै रोजीचा आरोपी पुनमसिंग टाक (३९ वर्ष) जप्त करण्यात आला. त्या आरोपीने ₹57,500चे मुद्देमाल आणि दोन दुचाकी

परभणीतील इको बँक एटीएम चोरीप्रकरण; चोरटा स्थागुशाच्या ताब्यात 

Eco Bank ATM Theft

 

५७ हजारांची रोकड, दोन दुचाकी जप्त चौकशीत इतर पाच गुन्ह्यांची उकल

परभणी (Eco Bank ATM Theft) : शहरातील इको बँकेच्या एटीएम फोडून चोरी केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  एक आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून  ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

शहरातील इको बँकेचे एटीएम फोडून चोरी केल्याचा गुन्हा  कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १८ जुलै रोजी सोनपेठ, परळी व आंबाजोगाई परिसरात तपास करीत असताना परळी वैजनाथ येथे गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आंबाजोगाई येथे छापा टाकून पुनमसिंग टाक वय ३९ वर्ष आंबाजोगाई   याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विचारपुस केली असता   जगजितसिंग आचोलसिंग दुधानी  रा.परळी , लक्ष्मणसिंग ठाकुरसिंग बावरी रा.नांदेड  तसेच जगजितसिंग दुधानी याच्या मावस भावासह परभणीतील एटीएम फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी पुनमसिंग टाक याच्याकडून  ५७ हजार ५०० रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन दुचाकी व गॅस सिलेंडर, गॅस कटर आदि साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपी जगजितसिंग आचोलसिंग दुधानी, लक्ष्मणसिंग ठाकुरसिंग बावरी व अन्य एक आरोपी यांचा शोध सुरु आहे.  

पुढील चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारां सह कोतवाली (परभणी), दैठणा, नानलपेठ, मुरुड  आणि उदगीर   या ठिकाणी मिळून एकूण पाच एटीएम चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाणे, येथे हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या सुचनेनुसार स्थागुशाचे पोनि.गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शना खाली  सपोनि.अशोक जायभाय, पोउपनि.चंदनसिंह परिहार, पोउपनि. गणेश सवंडकर, पोह. विलास सातपुते, सूर्यकांत फड, महेश कवठाळे, सचिन भदरगे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, नेताजी गित्ते, केशव लटपटे, महारुद्र सपकाळ, रंजित आगळे, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डबे, लक्ष्मण कांगणे, महेश पांगरकर, उत्तम हानवमे, विष्णु चव्हाण, मधुकर ढवळे, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, हनुमान ढगे, राम पौळ, निलेश परसोडे आणि प्रमोद पुरी यांच्या पथकाने केली.

संबंधित सामग्री

घरफोडीनंतर चोरट्यांचा एटीएमकडे वळविला मोर्चा

घरफोडीनंतर चोरट्यांचा एटीएमकडे वळविला मोर्चा

Hingoli ATM Robbery: चोरट्यांनी तर आता एटीएम केंद्रावर लक्ष केंद्रीत केले असुन शिवाजी नगर भागातील भर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Aug 13, 2026
अंबेजोगाईत एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे परभणी पोलिसांच्या ताब्यात

अंबेजोगाईत एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे परभणी पोलिसांच्या ताब्यात

शहरातील नवा मोंढा परिसरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनेचा तपास करत असताना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई येथे झालेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नातील चार चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

Jul 04, 2026
परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

UCO Bank ATM: नव्या मोंढा एटीएमवर सीसीटीवी कॅमेरावर चिखल फोडून रोकड लंपास करणारे गुन्हेगार दिशा बदलण्याच्या साठी चालू केले. युको बँकेच्या ५ लाख ५६ हजार रोप्यांची चोरी झालेली घटना परभणीत भेटलेली.

Jul 01, 2026
सोलापुरात धाडसी चोरी; एटीएम मशीनच उखडून नेल्याने खळबळ

सोलापुरात धाडसी चोरी; एटीएम मशीनच उखडून नेल्याने खळबळ

 सोलापूर शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली असून चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

May 16, 2026